Home उद्योग एथर एनर्जी लिमिटेडने नवीन एक्सपिरीयन्स सेंटर्स सुरू करून महाराष्ट्रातील आपली उपस्थिती मजबूत केली

एथर एनर्जी लिमिटेडने नवीन एक्सपिरीयन्स सेंटर्स सुरू करून महाराष्ट्रातील आपली उपस्थिती मजबूत केली

58 second read
0
0
10

no images were found

एथर एनर्जी लिमिटेडने नवीन एक्सपिरीयन्स सेंटर्स सुरू करून महाराष्ट्रातील आपली उपस्थिती मजबूत केली

 

 

 

 

महाराष्ट्र, : भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक एथर एनर्जी लिमिटेडने अलीकडेच महाराष्ट्रात 8 नवी एक्सपिरियंस सेंटर्स एथर स्पेसेस उघडली आहेत. ही सेंटर्स अलिबाग, भिवंडी, अकलूज, जालना, इचलकरंजी, खामगाव, बीड आणि मारूंजी येथे असून त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील एथरचे नेटवर्क अधिक मजबूत होत आहे. या एक्सपिरियंस सेंटर्समध्ये ग्राहक टेस्ट राइड घेऊ शकतात तसेच एथर 450 च्या परफॉर्मन्स-केंद्रित स्कूटर्स आणि रिझ्टा ही एथरची फॅमिली स्कूटर खरेदी करू शकतात.

        महाराष्ट्रात सध्या एथरची 25पेक्षा जास्त एक्सपिरियंस सेंटर्स आहेत आणि 31 डिसेंबर 2024 रोजी 301 एथर ग्रिड फास्ट चार्जर्स होती. एथर ग्रिड हे भारतातील सर्वात विस्तृत दुचाकी फास्ट चार्जिंग नेटवर्क आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी या नेटवर्कमध्ये देशभरात 2583 फास्ट चार्जर्स होती. या फास्ट चार्जर्समुळे मुंबई-लोणावळा आणि मुंबई-पुणे, लोणावळा-पुणे या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्गावर सुरळीत प्रवास सुनिश्चित होतो.

        या प्रसंगी बोलताना, एथर एनर्जी लिमिटेडचे चीफ बिझनेस ऑफिसर श्री. रवनीत सिंह फोकेला म्हणाले, “आमच्यासाठी महाराष्ट्र ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि या राज्यात 8 नवीन EC सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास वाटतो की, आमच्या फॅमिली स्कूटर रिझ्टा आणि परफॉर्मन्स स्कूटर एथर 450 सह आम्ही महाराष्ट्रातील आमच्या ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करू शकू. या नवीन ECs द्वारे आम्ही विस्तार करण्याचे आमचे धोरण कायम ठेवले आहे. या प्रांतात EVs अधिक सहजप्राप्य बनवून EV चा अंगिकार करण्याची प्रक्रिया त्रास—मुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

       एथरने अलीकडेच 2025 एथर 450 लॉन्च केली आहे. 2025 एथर 450X आणि एथर 450 अॅपेक्स मॉडेल्समध्ये मल्टी-मोड ट्रॅक्शन कंट्रोल आणि MagicTwistTM आहे, जो याआधी एथर अॅपेक्समध्ये दाखल करण्यात आला होता. तसेच एथर 450X 3.7kWh (IDC रेंज 161 किमी.) आणि 450 अॅपेक्स (IDC रेंज 157 किमी.) वर 130 किमी पर्यंत सुधारित TrueRangeTM आहे. 450X 2.9 kWh (IDC रेंज 126 किमी) आणि एथर 450S (IDC रेंज 122 किमी) देखील आता 105 किमी. पर्यंत सुधारित TrueRangeTM देईल. मल्टी-मोड ट्रक्शन कंट्रोल फीचरमुळे चालक रेन मोड, रोड मोड आणि रॅली मोड या तीन वेगवेगळ्या मोडमधून त्यांच्या नियंत्रणाच्या गरजेनुसार अनुकूल असा मोड निवडू शकतो. प्रत्येक मोड राइडिंगच्या आवश्यकतेनुसार फाइन-ट्यून केलेला आहे.

        रिझ्टा 2 मॉडेल्समध्ये तीन व्हॅरियन्टमध्ये उपलब्ध आहे: 2.9 kWh बॅटरी असलेली रिझ्टा S आणि रिझ्टा Z, आणि 3.7 kWh बॅटरी असलेली रिझ्टा Z. 2.9 kWh व्हॅरियन्टकडून 123 किमी रेंज अपेक्षित आहे, तर 3.7 kWh व्हॅरियन्ट 159 किमी इतकी रेंज देते. रिझ्टाची सीट अत्यंत आरामदायक आणि मोठी आहे. या गाडीची स्टोरेज स्पेस 56L असून त्यापैकी 34L सीटच्या खाली जागा आहे आणि 22L फ्रंक अॅक्सेसरीचा पर्याय आहे. प्रशस्त फ्लोअरबोर्ड चालकाला पाय ठेवण्याची ऐसपैस जागा प्रदान करतो. याव्यतिरिक्त, रिझ्टामध्ये स्किडकंट्रोल™ सारखी बरीच फीचर्स आहेत. शिवाय फॉलसेफ™, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ESS), थेफ्ट अँड टो अलर्ट्स आणि पिंग माय स्कूटर सारखी एथर 450 सिरीजमध्ये दिलेली सुरक्षा फीचर्स देखील रिझ्टामध्ये दिलेली आहेत.

     2.9 kWh बॅटरीच्या एथर रिझ्टा S ची किंमत 1,09,999 (एक्स-शोरूम, पुण्यात) आहे. 2.9 kWh बॅटरीची एथर रिझ्टा Z आणि 3.7 kWh बॅटरीची रिझ्टा अनुक्रमे 1,27,156/- आणि 1,47,157/- रुपयांत (एक्स-शोरूम, पुण्यात) उपलब्ध आहे. एथर 450 स्कूटर्स 1,22,100 रुपयापासून (एक्स-शोरूम, पुण्यात) उपलब्ध आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…   नवीन वर्षा…