
no images were found
आयसीआयसीआय प्रु गिफ्ट सिलेक्ट –सद्यस्थितीत शेयर बाजारात सुरु असलेल्या चढ-उतारांवर मात करत निश्चित उत्पन्न देणारा नवीन प्लॅन
मुंबई, : आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स ने आयसीआयसीआय प्रु गिफ्ट सिलेक्ट हा नवा दीर्घकालीन बचत प्लॅन सादर केला आहे, जो ग्राहकांना निश्चित उत्पन्नाची खात्री देतो आणि त्यांना गरजेच्या वेळी पैसे काढण्याची सुविधा देतो.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक लवचिक पर्याय उपलब्ध आहेत. निश्चित उत्पन्न कधी सुरू करायचे, निश्चित उत्पन्नाचा कालावधी, परिपक्वतेच्या म्हणजेच प्लॅनच्या मॅच्युरिटीवेळी ठराविक रक्कम मिळविण्याचे स्वातंत्र्य या प्लॅनमध्ये आहे. याशिवाय, यामध्ये जीवन विमा देखील आहे, जो कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करतो.
या प्लॅनची खासियत म्हणजे वाढत्या उत्पन्नाचा पर्याय, ज्यात उत्पन्न दरवर्षी ५% चक्रवाढ दराने वाढते. यामुळे महागाईच्या काळात देखील आर्थिक व्यवस्थापन करण्यास मदत होईल.
आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सचे प्रमुख उत्पादन आणि वितरण अधिकारी श्री. अमित पालटा म्हणाले, “आमच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या परिपाठीनुसार आम्ही नेहमीच ग्राहकांसाठी त्यांच्या बदलत्या गरजांनुसार नवीन आणि उपयोगी योजना आणत असतो. आयसीआयसीआय प्रु गिफ्ट सिलेक्ट हा असाच एक प्लॅन आहे, जो ग्राहकांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि रोख प्रवाहाच्या गरजांनुसार निश्चित उत्पन्नाची हमी देतो.”
मागील काही महिन्यांपासून आपण बाजारात अस्थिरता अनुभवली आहे. अशा अस्थिर स्थितीमध्ये, ग्राहक निश्चित परतावा आणि सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. हा प्लॅन ग्राहकांना बाजारातील चढ-उतारांपासून बचाव करत त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल.
या प्लॅनमधील वाढत्या उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामुळे ग्राहकांना महागाईची चिंता न करता अधिक दीर्घकालीन आर्थिक नियोजन करता येईल. आमच्या ग्राहकांना दिलेले वचन पाळण्याची आम्ही पूर्ण बांधिलकी घेतलेली आहे. याचेच उदाहरण म्हणजे वित्तीय वर्ष २०२५ च्या पहिल्या ९ महिन्यांत आमचा क्लेम सेटलमेंट रेट ९९.३% इतका राहिला आहे, म्हणजेच जवळपास सर्व विमा दावे यशस्वीपणे निकाली काढले गेले. तसेच, ज्या प्रकरणांमध्ये चौकशीची आवश्यकता नव्हती, त्यामध्ये सरासरी फक्त १.२ दिवसांत क्लेमचे पेमेंट करण्यात आले, ज्यामुळे ग्राहकांना वेगवान आणि सुलभ सेवा मिळू शकली.