Home आरोग्य डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये ‘चाईल्ड फ्रेंडली’ अत्याधुनिक बालरोग विभागाचा शुभारंभ 

डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये ‘चाईल्ड फ्रेंडली’ अत्याधुनिक बालरोग विभागाचा शुभारंभ 

23 second read
0
0
27

no images were found

डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये ‘चाईल्ड फ्रेंडली’ अत्याधुनिक बालरोग विभागाचा शुभारंभ 

-सौ. वैजयंती संजय पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):- डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा ‘चाईल्ड फ्रेंडली’ प्रशस्त बालरोग विभागाचा शुभारंभ करण्यात आला. १०० बेडच्या या अत्याधुनिक बालरोग विभागाचे उद्घाटन विश्वस्त सौ. वैजयंती संजय पाटील आणि अॅडव्हायझर सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

      गेल्या २० वर्षांपासून डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना मोफत अथवा अत्यंत माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच संकल्पनेतून हा प्रशस्त बालरोग विभाग साकार झाला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांनी यावेळी दिली. 

      या विभागात ६० बेडचा जनरल शिशु विभाग, ३० बेडचा नवजात शिशु विभाग तर १० बेडचा लहान मुलांसाठीचा अतिदक्षता विभाग  उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर थॅलेसिमियाग्रस्त  बालकांसाठी डे- केअर सुविधाही सुरु करण्यात आली आहे. या ठिकाणी अत्याधुनिक व्हेंटीलेटर्स, लेव्हल 3 प्रीमॅच्युअर बेबी केअर, मेंदू , पोट, किडनी, मुलांचे हाडाचे आजार  इत्यादीवर विविध शस्त्रक्रिया, एमआरआय, सिटी स्कॅन अशा सुविधा अत्यंत माफक खर्चात उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे बालरोग विभागप्रमुख डॉ. निवेदिता पाटील यांनी सांगितले.

     उपचारासाठी येणाऱ्या मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी दोन कक्ष  उभारण्यात आले आहे. विभागातील भिंती, वातावरण बालकांच्या भावजीवनाशी सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पालकांच्या समुपदेशानाची सेवाही देण्यात आली आहे. या बाल रोग विभागामध्ये अनुभवी व तज्ञ २७ डॉक्टर्स आणि २२ परिचारिका व सहाय्यक सेवेसाठी कार्यरत आहेत. 

     या अत्याधुनिक बालरोग विभागाच्या उद्घाटन सोहळ्याला कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, बालरोग विभागाच्या डॉ. मोहन पाटील, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. रमेश निगडे, डॉ. साईप्रसाद कवळेकर, डॉ. देवयानी कुलकर्णी, डॉ. प्रीती नाईक, डॉ. श्रद्धा कुलकर्णी, डॉ. अर्चना पवार, डॉ. रवींद्र पवार, डॉ. विलास जाधव, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, प्रा. सदानंद सबनीस, केतन जावडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…