
no images were found
माता अंजनीच्या रूपात झळकणार अभिनेत्री सायली साळुंखे
‘वीर हनुमान’ या भक्तिरसपूर्ण मालिकेच्या माध्यमातून सोनी सब वाहिनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यास सज्ज आहे. हनुमान ही आजही व्यापक प्रमाणात पूजली जाणारी देवता आहे. या मालिकेत हनुमानाचा प्रवास आणि त्याच्या जडणघडणीत केसरी आणि अंजनी या त्याच्या माता-पित्याची कशी महत्त्वाची भूमिका होती हे दाखवले जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सायली साळुंखे या मालिकेच्या कलाकार संचात दाखल झाली असून हनुमानाच्या प्रेमळ मातेच्या महत्त्वाच्या भूमिकेत ती झळकणार आहे.
अंजनीचे आपल्या पुत्रावरील प्रेम, तिची उपस्थिती आणि तिने सतत दिलेले प्रोत्साहन यांच्या पायावर हनुमानाचे महान चरित्र उभे आहे. आपल्या पुत्राचे संगोपन करताना अंजनी हनुमानाला धैर्य, निःस्वार्थीपणा आणि भक्ती या मूल्यांची शिकवण देते.
अंजनी या आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना सायली साळुंखे म्हणाली, “आपल्या मुलांसाठी एक आईचे निरपेक्ष प्रेम आणि तिची शक्ती अमाप असते. अंजनीचे हनुमानाशी असलेले नाते पडद्यावर जिवंत करण्याचा अनुभव नतमस्तक करणारा आणि प्रेरणादायक होता. हनुमानाच्या जीवनात अंजनीचे स्थान एका आईपेक्षा अधिक होते. ती त्याची मार्गदर्शक आहे आणि त्याचा भक्कम आधार आहे. तिनेच त्याला घडवले आहे. मी प्रथमच पौराणिक भूमिका करत आहे. ही भूमिका करताना मी रोमांच अनुभवते आहे.”