Home मनोरंजन आन तिवारी  ‘वीर हनुमान’ या मालिकेत बाल हनुमानाची भूमिका करणार

आन तिवारी  ‘वीर हनुमान’ या मालिकेत बाल हनुमानाची भूमिका करणार

1 second read
0
0
15

no images were found

आन तिवारी  ‘वीर हनुमान’ या मालिकेत बाल हनुमानाची भूमिका करणार

सोनी सब वाहिनी आपल्या ‘वीर हनुमान’ या आगामी पौराणिक मालिकेद्वारे प्रेक्षकांना भक्तीरसाचा आनंद देण्यासाठी येत आहे. ही भव्य मालिका प्रेक्षकांच्या मनात भक्तीभाव जागृत करून त्यांना आध्यात्मिक आनंद देईल. या मालिकेतील कलाकारांच्या संचात आन तिवारी या बालकलाकाराचे नाव दाखल होत आहे. प्रतिभावान आन बाल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.आजवर काही मोठ्या मालिका आणि पौराणिक मालिकांमध्ये बाल शिवाच्या रूपात झळकलेल्या आनने खूप लहान वयात पडद्यावर आपली मोहकता दाखवली आहे. बाल हनुमानाचा खोडकरपणा, त्याची निरागसता आणि अढळ भक्ती तो पडद्यावर साकारताना दिसेल. त्याने साकारलेला हा बाल हनुमान सर्व वयोगटांच्या प्रेक्षकांना नक्कीच लोभस आणि आपलासा वाटेल.

ही भूमिका करण्यासाठी आतुर असलेला आन तिवारी म्हणतो, “हनुमानाची भूमिका मी करणार याचा मला खूप आनंद होत आहे. मला हनुमानाच्या कथा ऐकायला फारच आवडते. आणि आता पडद्यावर मला हनुमानाचीच भूमिका करायला मिळत आहे. माझ्या आई-वडिलांकडून मी ऐकले आहे की, हनुमान आपल्याला दयाळू आणि निर्भय होण्याची शिकवण देतो. त्याची कहाणी मनापासून साकार करून सगळ्यांचे प्रेम आणि विश्वास जिंकण्याचा मी प्रयत्न करीन. त्याच्यातील शक्ती समजून घेऊन त्याच्यासारखा ‘जय श्रीराम’ हा जयघोष करताना मला खराखुरा सुपरस्टार असल्यासारखेच वाटते. मला काम करताना जितका आनंद होत आहे, तितकाच आनंद प्रेक्षकांना ‘वीर हनुमान’ पडद्यावर बघताना होईल अशी मला आशा आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …