
no images were found
लम्पीने मृत झालेल्या जनावरांच्या मालकांना मदत जाहीर
लम्पी आजाराच्या फैलावामुळे शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी जनावरे ल्म्पीमुळे आजारी पडून दगावत आहेत. मुळातच अडचणीत असलेले शेतकरी अशाप्रकारे जनावरे मृत झालेमुळे आर्थिक संकटात आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे. लम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. 12 ऑक्टोबर (बुधवार) 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला 30 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्यास 25 हजार रुपयांचं आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. तर वासराचा मृत्यू झाल्या 16 हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून कडून मदतीचा हा शासन आदेश बुधवारी जारी करण्यात आलएला आहे. 4 ऑगस्टपासून ज्यांची जनावरं लम्पी आजारामुळे मृत्युमुखी पडली आहेत, त्यांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांप्रमाणे ही मदत जाहीर करण्यात आली आहे. अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक हे निकष शिथील करून राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे सर्वांना अर्थसहाय्य मिळावं, या अनुषंगाने राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे. मृत पशुधनाच्या संख्येवरील निर्बंधांचे निकष सुद्धा ही मदत देताना शिथील करण्यात येणार आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल.