
no images were found
अधिक उत्पादन आणि कमी खर्चात कांदा शेतीत ‘महाधन क्रॉपटेक’ची क्रांती
महाधन अॅग्रीटेक लिमिटेडने विकसित केलेले ‘क्रॉपटेक’ हे क्रांतिकारी व नवीनपूर्णा खत सुरू झाल्यापासून वर्षभरातच ते भारतभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह सहकारी म्हणून प्रस्थापित झाले आहे. ‘क्रॉपटेक’ आपल्या अनोख्या न्यूट्रिएंट अनलॉक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना १५ ते २० टक्क्यांपर्यंत अधिक उत्पादन मिळविण्यास मदत करत आहे आणि खतांच्या खर्चात सुमारे २० टक्के पर्यंत बचत करीत आहे.
सिद्ध फायदे
क्रॉपटेकचे नाविन्यपूर्ण एकल-ग्रॅन्युल सूत्र सल्फर, मॅग्नेशियम सारख्या दुय्यम अन्नद्रव्यांसह एनपीकेचे सर्वसमावेशक मिश्रण प्रदान करून झिंक (Zn), बोरॉन (B) आणि फेरस (Fe) सारख्या महत्त्वपूर्ण सूक्ष्म पोषक द्रव्यांचे वितरण करते. कांदा पिकासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले क्रॉपटेक ८:२१:२१ खतामुळे संतुलीत अन्नद्रव्यांचा पुरवठा करते, अपव्यय कमी आणि निरोगी जमीन सुनिश्चित होते, ज्यामुळे शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनते.
या यशाबद्दल महाधन अॅग्रीटेक लिमिटेडचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर नरेश देशमुख यांनी सांगितले.
“गेल्या काही वर्षात क्रॉपटेक खताने शेतात आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे, ज्यामुळे शेतकरी कमी खत वापरू शकतात आणि तरीही अधिक दर्जेदार व गुनावत्तपूर्णा उत्पादन मिळवू शकतात. शेतकऱ्यांकडून सातत्याने मिळणारा अभिप्राय आणि उत्पादनात दिसणारी लक्षणीय सुधारणा नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक कृषी उपाय योजना देण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करते.
शेतकऱ्यांवर होणारा परिणाम
क्रॉपटेक चा अवलंब केल्यापासून प्रमुख कांदा उत्पादक भागातील शेतकऱ्यांनी पीक उत्पादकता आणि खर्चात लक्षणीय सुधारणा नोंदविली आहे.
“सुरुवातीला जेव्हा मी क्रॉपटेक ८:२१:२१ वापरायचा प्रयत्न केला तेव्हा माझा सिंगल-ग्रॅन्युल फॉर्म्युल्यावर विश्वास नव्हता. पण गेल्या दोन हंगामात वापर केल्यानंतर तो खरोखरच माझ्यासाठी डोळे उघडणारा ठरला आहे. यामुळे माझा पैसा, वेळ वाचला आणि माझ्या उत्पादनात 17% वाढ झाली. शिवाय माझ्या उत्पादनाचा दर्जाही सुधारला आहे, ज्यामुळे मला चांगला भाव मिळण्यास मदत झाली आहे. भारतातील प्रत्येक तंत्रज्ञानप्रेमी कांदा उत्पादक शेतकऱ्याला याची शिफारस करण्यात मला संकोच वाटत नाही,’ असे अहमदनगरचे शेतकरी विभीषण पोपट निभोरे, रहाणेरे, घोटवी गाव, श्रीगोंदा, यांनी सांगितले.
भविष्यासाठी शाश्वत शेती
त्याच्या सिद्ध फायद्यांसह, क्रॉपटेक आधुनिक शेतीतील उत्पादकता आणि खर्च या दुहेरी आव्हानांना तोंड देत अधिक कार्यक्षम आणि शाश्वत शेती पद्धतींकडे वळत आहे.
Tमहाधन अॅग्रीटेक लिमिटेड बद्दल
महाधन अॅग्रीटेक लिमिटेड (दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडची १००% उप-कंपनी) नाविन्यपूर्ण पोषण समाधानासह आधुनिक खते प्रदान करून उत्पादन सुधारते व शाश्वत शेतीस चालनादेणारी अग्रेसर कंपनी असून , भविष्यातील समृद्ध शेतीच्या निर्मितीमध्ये हातभार लावण्यासाठी कटिबद्ध आहे