
no images were found
वसुधा’ मध्ये तब्बल 16 किलोचा नववधूचा पोशाख!
झी टीव्हीवरील सुरुवातीपासूनच ‘वसुधा’ ही मालिका आपल्या आकर्षक कथानक आणि बळकट व्यक्तिरेखांच्या जोरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून आहे. आगामी एपिसोडमध्ये चाहत्यांना आणखी काही नाट्य आणि त्यांच्या आवडत्या वसुधा (प्रिया ठाकुर) हिला आकर्षक नववधूच्या पोशाखामध्ये पाहायला मिळेल. हा पोशाख तब्बल 16 किलोचा असून लग्नाच्या दृश्याबद्दल औत्सुक्य ताणले गेले आहे.
प्रथमच प्रेक्षक त्यांच्या आवडत्या वसूला एका संपूर्णपणे नवीन अवतारात पाहणार आहेत. गाँव की छोरी पासून एक आकर्षक नववधू बनलेली वसू आपल्या दुल्हन लूकसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज आहे. अतिशय नाजूक नक्षीकाम केलेला तिचा लेहंगा हा किरमिजी आणि सोनेरी रंगाच्या समृद्ध छटांमध्ये अतिशय सुरेख अशा आधुनिक सौंदर्यासह पारंपारिक कलात्मकतेने बनवण्यात आला आहे. तिच्या या पोशाखामध्ये अत्यंत सुंदर नक्षीकाम आणि जडाव बसवण्यात आले असून त्यातून क्रिएटिव्ह टीमचे समर्पण दिसून येते. हा पोशाख एवढा जड असूनही प्रिया ठाकूरने अत्यंत उत्तम प्रकारे तो सांभाळला आणि हे दृश्य जीवंत केले. नक्कीच ते प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळासाठी घर करून राहील.
प्रिया म्हणाली, “मी जेव्हा प्रथम हा लेहेंगा पाहिला, तेव्हा माझी नजरच त्यावरून हटत नव्हती. तो खरोखरीच अत्यंत कलात्मक पद्धतीने बनवण्यात आला असून थेट एखाद्या राजेशाही लग्नाला साजेसा आहे. त्याचबरोबर मला हेही कबूल करायला हवे की 16 किलो वजन असलेला पोशाख परिधान करणे हे सोपे काम नव्हते, खासकरून त्यासोबत या जड दागिन्यांसमवेत आणि तेही हील्समध्ये. लेहेंगा आणि दागिन्यांचे वजन आणि त्यासोबत चित्रीकरणासाठी लागणारा दीर्घ समय यांमुळे मला पुष्कळ स्टॅमिना आणि एनर्जी राखावी लागली. पण ज्या क्षणी मी हा माझ्या अंगावर चढवला आणि आरशात पाहिले, त्याक्षणी माझ्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा जागृत झाली आणि वसुधाच्या व्यक्तिरेखा आणि तिच्या भावनांमध्ये मी डोकावू शकले.”pती पुढे म्हणाली, “नववधूप्रमाणे तयार होणे मग भले ते एखाद्या भूमिकेसाठी का असो हा नेहमीच एक खास जादुई, भावनिक आणि अविस्मरणीय अनुभव असतो. क्रिएटिव्ह टीम आणि मी या सगळ्या गोष्टींसाठी बारकाईने काम केले. हार, कानातले आणि मांग टिका असे दागिने निवडण्यामध्येही मी सहभाग0 घेतला. माझ्या पेहरावाला साजेसे असे दागिने आम्ही स्वतः निवडले. मला आशा आहे की प्रेक्षकांना हे दृश्य पाहताना तेवढाच आनंद होईल जेवढे आम्हाला ते निर्माण करताना आले.”
वसुधा आणि देवांश (अभिषेक शर्मा) च्या प्रवासात या लग्नामुळे एक नाटय़मय वळण आले असून आता प्रेक्षकांना आणखी काही अनपेक्षित वळणे आणि भावनांना सामोरे जावे लागेल आणि ‘वसुधा’ साठी ते झी टीव्हीच्या स्क्रीनला खिळून राहतील.