
no images were found
कलाकारांनी शालेय दिवसांमधील प्रजासत्ताक दिन साजरीकरणाच्या गोड आठवणींना दिला उजाळा!
प्रजासत्ताक दिन जल्लोषात व उत्साहात साजरा केला जातो, जो एकता व देशभक्तीचे प्रतीक आहे. एण्ड टीव्ही कलाकार जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या शालेय दिवसांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या आठवणींबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत रवी महाशब्दे (मालिका ‘अटल’मधील क्रिष्णन बिहारी वाजपेयी), स्मिता साबळे (मालिका ‘भीमा’मधील धनिया), गीतांजली मिश्रा, मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील राजेश) आणि विदिशा श्रीवास्तव (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अनिता भाबी). मालिका ‘अटल’मधील रवी महाशब्दे ऊर्फ क्रिष्णन बिहारी वाजपेयी म्हणाले, ”शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा केला जायचा, सर्वत्र उत्साहाचे वातावरण असायचे. मी सकाळी लवकर उठून इस्त्री केलेला शालेय गणवेश परिधान करायचो आणि परेडसाठी सज्ज राहायचो. ढोलाच्या तालावर माझ्या वर्गमित्रांसोबत परेड करताना जाणवलेली अभिमानाची भावना अविश्वसनीय होती. सर्वांसोबत ‘ऐ वतन’ आणि ‘सारे जहाँ से अच्छा’ यासारखी देशभक्तीपर गाणी गाण्याचा अनुभव भावूक होता. मी अनेकदा भारत प्रजासत्ताक बनण्याच्या प्रवासाबाबत भाषणे केली. या भाषणांची तयारी करताना मला आपल्या इतिहासाबाबत भरपूर काही समजले आणि आपल्या संविधानाप्रती माझ्यामध्ये मोठा आदर निर्माण झाला. ध्वजारोहण समारोहासह उंच आकाशात फडकणारा तिरंगा पाहून अंगावर काटा यायचा. ते क्षण सदैव माझ्या मनात आहेत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” मालिका ‘भीमा’मधील स्मिता साबळे ऊर्फ धनिया म्हणाल्या, ”माझ्यासाठी प्रजासत्ताक दिन म्हणजे शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासारखा होता. मला भारताचा स्वातंत्र्य संघर्ष व वैविध्यपूर्ण संस्कृती दाखवले जाणारे स्किट्स आणि नृत्यांमध्ये सहभाग घ्यायला आवडायचे. परफॉर्मन्सप्रमाणेच तालीम करताना देखील खूप धमाल यायची. ते सेलिब्रेशन्स फक्त परफॉर्मन्सबाबत नव्हते तर आपल्या देशाच्या मोठ्या सेलिब्रेशनचा आणि अविश्वसनीय प्रवासाचा भाग बनण्याची संधी देखील होते. आपण सर्वांनी एकत्र आपल्या संविधानाचे मूल्य जपूया आणि देशासाठी उज्ज्वल भविष्य घडवूया.”