no images were found
डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील ५ विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवड
इचलकरंजी(प्रतिनिधी) : येथील डिकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील पाच विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी निवड झाली आहे. रोहिनी पाटील हीची असिस्टंट टाऊन प्लॅनर म्हणून टाऊन प्लॅनिंग ऑफीस मध्ये निवड झाली आहे. अक्षिता शेळके हीची ज्यूनिअर इंजिनिअर म्हणून वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये, नंदीनी काळे हीची पीडब्ल्यूडी खात्यात, ॠुतिक दुधाळ हयाची ज्युनिअर इंजिनिअर म्हणून नगरपरिषदेमध्ये तर शुभम नानेकर हयाची पीडब्ल्यूडी खात्यात निवड झाली आहे. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश उल्लेखन्नीय आहे.
सध्या सिव्हील विभागातील क्षेत्रामध्ये गर्व्हमेंट सेक्टरमध्ये सिव्हील इंजिनिअरींग विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत या संधीचा फायदा डीकेटीईतील विद्यार्थ्यांसाठी व्हावा या हेतुने डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांसाठी गर्व्हर्मेंट सेक्टर मधील नोकरीसाठी वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान, कार्यशाळा याचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन मिळत असून सिव्हील विभागातील विद्यार्थ्यांमध्ये गर्व्हर्मेंट जॉब मिळविण्याची महत्वकांक्षा आहे ती डीकेटीईच्या माध्यमातून साकारत आहे. डीकेटीईमध्ये उपलब्ध असलेले सुसज्ज अशी लायब्ररी, अत्याधुनिक सॉफटवेअरर्स याचा विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा परिक्षामध्ये भाग घेण्यासाठी लाभ होत आहे. तसेच डीकेटीईच्या सिव्हील विभागातील विद्यार्थ्यांचे शंभर टक्के प्लेसमेंट देखील होत आहेत.
सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास पात्र आहे. डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभाग विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान देण्यास नेहमी कटिबध्द असून भविष्यात अशा सरकारी नोक-यांमध्ये डीकेटीईचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची निवड व्हावी यासाठी डीकेटीई नेहमी प्रयत्नशील असेल असा विश्वास संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी व्यक्त केला.
सदर विद्यार्थ्याच्या या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्र. संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख ए.एल.मुल्ला यांचे मागदर्शन मिळाले.