Home सामाजिक प्रजासत्ताक दिनी सोनी सबचे कलाकार आपल्या राष्ट्राच्या निःस्वार्थी नायकांना सलामी 

प्रजासत्ताक दिनी सोनी सबचे कलाकार आपल्या राष्ट्राच्या निःस्वार्थी नायकांना सलामी 

1 second read
0
0
25

no images were found

प्रजासत्ताक दिनी सोनी सबचे कलाकार आपल्या राष्ट्राच्या निःस्वार्थी नायकांना सलामी 

प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी 1950 साली भारताची घटना अंमलात आली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, सोनी सबचे कलाकार देशाच्या चरणी निःस्वार्थ सेवा अर्पण करणाऱ्या आणि देशातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या आपल्या शूर सैनिकांबद्दलची कृतज्ञता एकमुखाने व्यक्त करत आहेत. देशात एकता, लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या भावनेचा आनंद साजरा होत असताना आपल्या मालिकांमधून हास्य आणि सकारात्मकता यांचा प्रसार करणारे सुमित कौल, सुमित राघवन, पंकज बेरी, जयेश भारभाया आणि सचिन परीख यांसारखे कलाकार देशाची सेवा करणाऱ्या शूर सैनिकांना मानवंदना देत आहेत.

‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत राजेश वागलेची भूमिका करणारा अभिनेता सुमित राघवन म्हणतो, “लहानपणी मी आपल्या सैनिकांच्या, त्यांच्या शौर्याच्या, देशाच्या सीमेवर भयंकर आव्हानांना तोंड देण्याच्या, तीव्र हवामानाशी आणि अनपेक्षित संकटांशी सामना करण्याच्या आणि त्याच वेळी कर्तव्यनिष्ठा अढळ ठेवण्याच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना त्यांच्या बलिदानाचे स्मरण न करणे कृतघ्नपणाचे ठरेल. केवळ त्यांच्या निष्ठेमुळेच आपण एका स्वतंत्र आणि शांत देशात जगू शकत आहोत. ते सतत मला प्रेरणा देतात, मला या गोष्टीचे स्मरण देतात की, खरी हिंमत शांत क्षणी, प्रकाश झोतापासून दूर असतानाच येते. आपल्या राष्ट्रासाठी मूकपणे लढा देणाऱ्या सैनिकांनो, तुम्हाला शतशः प्रणाम. जय हिंद!”

‘ तेनाली रामा’ मालिकेत गिरगिटची भूमिका करणारा सुमित कौल म्हणतो, “सियाचीन ग्लेशियरवर कर्तव्य बजावणाऱ्या एका निवृत्त सैनिकांकडून मी एक कथा ऐकली होती. त्याने तिथले एकाकीपण आणि गात्रे थिजवणाऱ्या थंडीबद्दल सांगितले. परंतु, देशाचे रक्षण करणे हेच आपले कर्तव्य असल्यामुळे आपण आपले कर्तव्य त्याही परिस्थितीत पार पाडू शकलो, असे त्याने सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी अशा सर्व सैनिकांचे स्मरण करत आहे, ज्यांना त्यांच्या पात्रतेनुसार मान्यता मिळालेली नाही, पण तरीही ते रात्रंदिवस सचोटीने आणि शौर्याने देश सेवा करत आहेत. ते आपले खरे नायक आहेत. तेच आपल्या देशाच्या सीमेचे आणि आपल्या घटनेच्या मूळ गाभ्याचे रक्षण करतात. आपण त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. जय हिंद!”

‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दिलीप पटेलची भूमिका करणारा जयेश भारभाया म्हणतो, “या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मला माझ्या एका जुन्या कौटुंबिक मित्राची आठवण झाली, त्याने युद्ध प्रत्यक्ष अनुभवले होते. त्याने एकदा मला सांगितले, “तुम्ही जेव्हा रणभूमीत असता, त्यावेळी तुमच्या सोबत्यांची सुरक्षा आणि तुमचे देशप्रेम यापुढे तुम्हाला जीवनातील अन्य कोणत्याच गोष्टीला अर्थ वाटत नाही. सैनिकांना एकमेकांबद्दल वाटणारी बंधूभावना आणि एका  उदात्त उद्देशाप्रती त्यांच्या मनात असलेली निष्ठा यामुळेच ते आपल्या राष्ट्राचे खरेखुरे आधारस्तंभ ठरतात. आज हा दिवस साजरा करताना मला त्या सर्व सैनिकांची आठवण येत आहे, ज्यांनी लक्षणीय कामगिरी केली, प्रचंड संकटांना तोंड दिले आणि खूप मोठे बलिदान दिले. त्यांची हिंमत आणि लवचिकता यामुळेच भारत देश मजबूत बनतो. जय हिंद!”

‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत मनीष पारेखची भूमिका करणारा सचिन परीख म्हणतो, “मला एकदा एका अशा सैनिकाशी बोलण्याची संधी मिळाली होती, ज्याने अनेक वर्षे देशाच्या सीमेवर, एका दुर्गम, थंड ठिकाणी अनेक वर्षे काम केले होते. त्याने मला सांगितले की तो नेहमी आपल्या घरच्यांना पत्र लिहीत असे, पण त्यात त्या खडतर स्थितीविषयी तक्रार कधीच नसे. त्याची कर्तव्य भावना अढळ होती. या प्रजासत्ताक दिनी मला त्याचा आणि आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशासाठी निःस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या सर्व सैनिकांचा विचार मनात येत आहे. आपण, या देशाचे नागरिक शांती आणि सलोख्याने या देशात नांदू शकू ही खातरजमा करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांचे बळ हीच खरी देशभक्ती. जय हिंद!”

‘तेनाली रामा’ मालिकेत तथाचार्य ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता पंकज बेरी म्हणतो, “रात्रंदिवस देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या, आपल्या देशाचे आणि देशातील मूल्यांचे रक्षण करणाऱ्या आपल्या शूर सैनिकांना आज आपण आदरांजली वाहतो. तुमची निष्ठा आणि निःस्वार्थ भावना यांच्या पायावर देशाचे स्वातंत्र्य उभे आहे आणि आपल्या देशाच्या ठायी तुम्ही समर्पित केलेल्या सेवेबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. आम्ही तुम्हाला सलाम करतो. जय हिंद!”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…