
no images were found
‘झी टीव्ही’वरील चार मालिकांचे आता आठवड्याचे सातही दिवस प्रसारण!
भारतातील हिंदी सर्वसाधारण मनोरंजन क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या ‘झी टीव्ही’ वाहिनीने प्राइम टाइमवर आपले वर्चस्व गाजविले असून त्यामागे विचार प्रक्षोभक कथानकाच्या मालिका आणि हव्याहव्याशा व्यक्तिरेखांचा वाटा मोठा आहे. आता आगामी उत्सवी काळात आपल्या निष्ठावान प्रेक्षकांसाठी आपल्या समृध्द कथामालिकांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने या वाहिनीने वीकेण्डलाही आपल्या चार मालिकांचे प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. मीत, मैं हूँ अपराजिता, प्यार का पहला नाम राधा मोहन आणि भाग्यलक्ष्मी या चार मालिकांचे प्रसारण आता रविवार, 16 ऑक्टोबरपासून आठवड्याचे सातही दिवस केले जाणार आहे.
गेली 30 वर्षे या वाहिनीने दर्जेदार कथानके आणि उत्कृष्ट सादरीकरणाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. आता मीत, मैं हूँ अपराजिता, प्यार का पहला नाम राधा मोहन आणि भाग्यलक्ष्मी या चारही मालिका शनिवार-रविवारीही त्यांच्या नेहमीच्याच वेळेवर, म्हणजे अनुक्रमे 7.00 वाजता, 7.30 वाजता, 8.00 वाजता आणि 8.30 वाजता प्रसारित केल्या जातील.