
no images were found
देखभाल दुरुस्तीचे व क्रॉसिंगच्या कामामुळे सोमवारी व मंगळवारी पाणीपुरवठा बंद
कोल्हापूर (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे पुईखडी सब स्टेशन च्या 33 के व्ही व 110 के व्ही मुख्य विज वाहिनीचे मासिक देखभाल दुरुस्तीचे कामकाज महावितरण मार्फत सोमवारी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे कोई खडी सब स्टेशनचा विद्युत पुरवठा बंद राहणार असलेने पाणी उपसा होऊ शकणार नाही. त्यामुळे सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी तू इकडे येथून पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.
तसेच काळम्मावाडी योजनेच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे काम, अमृत – 1 योजने अंतर्गत बावडा फिल्टर नविन पंपहाऊस येथील ग्रॅव्हिटी मेनच्या क्रॉस कनेक्शन व सुभाष नगर पंपींग येथील नविन रायझींग मेनलाईन जोडण्याचे काम सोमवारी व मंगळवार, दि. 6 व 7 जानेवारी 2025 रोजी हाती घेण्यात येणार असलेने शहरातील ए, बी, सी, डी, ई वॉर्ड सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागामध्ये दैनंदिन होणारा पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच बुधवार दि.08 जानेवारी 2025 रोजी होणार पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. त्याचप्रमाणे बालिंगा व चंबुखडी टाकीवरून सी व डी वॉर्डमध्ये होणारा पाणी पुरवठा दैनंदिन नियोजना प्रमाणे सुरू राहील.
यामध्ये ए, बी, वॉर्ड अंतर्गत फुलेवाडी रिंगरोड, गजानन कॉलनी, जयभवानी कॉलनी, अयोध्या कॉलनी, गजानन कॉलनी, लक्ष्मीनारायण कॉलनी, संतसेना, अभीयंता कॉलनी, मातंग वसाहत, बोंद्रेनगर, शिवशक्ती नगर, मथूरानगरी, धनगर वाडा, इंगवले कॉलनी, गडकरी कॉलनी, कोतवाल नगर, नृसिंह कॉलनी. सतयाई कॉलनी, राज्याभिषेक कॉलनी, डायना कॅसल, अष्टविनायक कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, धनगर वाडा, माऊली नगर, दत्तकॉलनी व पुर्ण रिंगरोड, नाना पाटीलनगर, बीडी कॉलनी, राजोपाध्येनगर, राजेसंभाजीनगर, गंधर्व नगरी, तुळजाभवानी कॉलनी, महादेव नगरी, पांडुरंगनगरी, सर्वे कॉलनी, गणेश कॉलनी, टाकळकर कॉलनी, संपुर्ण राधानगरी रोड, हरिओम नगर, मोहिते मळा, इंद्रपस्थनगर, देवणे कॉलनी, सुश्रृषा नगरी, महालक्ष्मी पार्क, केदार पार्क, शिवराम पोवार कॉलनी, क्रशर चौक झोपडपटटी, गजलक्ष्मी पार्क, राधानगरी रोड परिसर सलग्नीत ग्रामिण भाग, सरदार तालिम परिसर, खंडोबा तालिम परिसर, तटाकडील तालीम परिसर, मर्दानी खेळाचा आखाडा, संध्यामठ, मरगाई गल्ली, अर्धा शिवाजी पुतळा परिसर, ब्रम्हेश्वर, साकोली, बिनखांबी परिसर, मिरजकर तिकटी, दिलबहार तालिम परिसर, टेंभी रोड, बाल गोपाल तालिम, बाराईमाम, शिवाजी पेठ, खंडोबा तालिम, जुना वाशीनाका, विजय नगर, वांगीबोळ, उमा टॉकीज परिसर, गुजरी व सलग्नीत ग्रामिण. ई वॉर्ड राजारामपुरी वितरण अंतर्गत संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल परिसर, शाहुमिल कॉलनी, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यु कॉलनी, अरूणोदय, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कुल, सम्राट नगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारूती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदीर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डीफेन्स परिसर, राजाराम रायफल, काटकरमाळ, संपूर्ण कसबा बावडा, लाईन बाजार, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, महाडीक वसाहत, रूईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसर, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजीपार्क, फ्रेंड्स कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रमणमळा, शाहुपूरी व्यापारपेठ, व्हीनस कॉर्नर, शाहुपूरी 1 ते 4 गल्ली, बी.टी.कॉलेज परिसर, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.