Home धार्मिक कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात ‘सामूहिक आरती’ला प्रारंभ!

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात ‘सामूहिक आरती’ला प्रारंभ!

13 second read
0
0
18

no images were found

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात ‘सामूहिक आरती’ला प्रारंभ!

 

कोल्हापूर(प्रतिनिधी) :- ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्‍वस्तांनी घेतला होता. त्यानुसार शुक्रवार, 3 जानेवारीला कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात रात्री 8 वाजता सौ. प्रीती आणि श्री. प्रीतम पवार या दांपत्याच्या हस्ते आरती करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात ज्या वेळेत आरती होते त्याच वेळेत ही आरती करण्यात आली. हिंदु राष्ट्राची स्थापना, मंदिरांच्या पवित्रतेचे रक्षण करणे, हिंदू समाजात एकता आणि जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने ही आरती चालू करण्यात आली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, करवीर तालुका संयोजक श्री. आप्पासाहेब गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, महाराजा प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, ‘शिवशाही फाऊंडेश’नचे संस्थापक श्री. सुनील सामंत,  अखिल भारत हिंदू महासेभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने सर्वश्री रामभाऊ मेथे, अनिकेत गुरव, बाबूराव पाटील, विक्रम जरग यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी  भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचसमवेत सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वंदनीय उपस्थितीत वाकरे (तालुका करवीर) येथील नृसिंह मंदिर येथेही सामूहिक आरती करण्यात आली. 

      24 आणि 25 डिसेंबर 2024 ला श्री साई पालखी निवारा, निमगांव, शिर्डी येथे झालेल्या तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त महाराष्ट्रभरातून 875 हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्‍वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते तथा मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने सरकारने राज्यातील सर्व मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत; मंदिरात भक्तांनी अर्पण केलेला निधी महाराष्ट्र सरकारने विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी;  राज्यातील मंदिरांच्या पुजार्‍यांना प्रतिमाह मानधन देण्याचा निर्णय घ्यावा आदी प्रमुख मागण्या ठरावांद्वारे सरकारकडे करण्यात आल्या होत्या. या मागण्या सरकारने तात्काळ पूर्ण करव्यात, अशी मागणी मंदिर महासंघाचेअसे आवाहन मंदिर महासंघाचे संयोजक श्री. प्रमोद सावंत, सहसंयोजक श्री. अभिजित पाटील आणि समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी  यांनी केले आहे.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …