Home सामाजिक दिव्यांगाप्रती समाजामध्ये जाणीव-जागृती निर्माण होणे महत्त्वाचे: डॉ. विनय कुमार पाठक

दिव्यांगाप्रती समाजामध्ये जाणीव-जागृती निर्माण होणे महत्त्वाचे: डॉ. विनय कुमार पाठक

26 second read
0
0
43

no images were found

दिव्यांगाप्रती समाजामध्ये जाणीव-जागृती निर्माण होणे महत्त्वाचे: डॉ. विनय कुमार पाठक

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी):- दिव्यांग व्यक्तींप्रती समाजामध्ये चेतना, जाणीव-जागृती निर्माण करणे फार महत्वाचे कार्य आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे योगदान मोलाचे ठरते, असे प्रतिपादन  अखिल भारतीय विकलांग चेतना परिषदेचे अध्यक्ष डॉ.विनय कुमार पाठक यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील हिंदी व इंग्रजी अधिविभाग आणि अखिल भारतीय विकलांग चेतना परिषद (छत्तीसगड, बिलासपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकलांग विमर्श के निकष पर भाषा और साहित्य’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन समारंभ विद्यापीठाच्या निलांबरी सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

         डॉ. पाठक म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या उन्नतीसंदर्भात काम करणे हीच खरी मानव सेवा आहे. विकलांगता निश्चित स्वरूपात दूर होऊ शकते. अशी व्यक्ती अनेक कामे करण्यास सक्षम असतात.  समाजाने त्यांच्याप्रती फक्त दयाभाव दाखविण्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यामुळे समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणे सहज शक्य होईल. दिव्यांगांमध्ये चेतना निर्माण करण्याचे महान कार्य छत्तीसगड, महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी होत आहे. विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुसह्य करण्यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे. हे कार्य संपूर्ण देशामध्ये चेतना आणि ऊर्जा निर्माण करणारे ठरेल.

        अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात भारतीय भाषांसोबत सामाजिक व विज्ञान शाखांच्या वतीने संयुक्त संशोधन होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादामधील विचारमंथन मार्गदर्शक स्वरुपाचे ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ. प्रभंजन माने, हिंदी अधिविभागप्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी मनोगते व्यक्त केली.

         सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपटयास पाणी घालून परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. गीता दोडमणी यांनी हिंदीतून मराठीत अनुवादित केलेल्या ‘विकलांग विमर्श: दशा आणि दिशा’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

       डॉ. मनोहर वासवानी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अक्षय सरवदे यांनी आभार मानले. डॉ. सुषमा चौगले व मृणाल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी हैद्राबाद येथील इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठाचे डॉ.अमित कुमार, दिल्लीतील डॉ. प्रीती गच्चे, छत्तीसगड उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ.चंद्रभूषण वाजपेयी, परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.मदन मोहन अग्रवाल, डॉ.सुरेश माहेश्वरी, डॉ.चंद्रकांत लंगरे, डॉ.राजश्री बारवेकर, डॉ.दिपक भादले, डॉ.प्रकाश मुंज यांच्यासह देशभरातून शंभरहून अधिक विद्यार्थी या परिसंवादासाठी उपस्थित राहिले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…