Home शैक्षणिक डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला विविध विषयांवर 22 पेटंट मंजूर

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला विविध विषयांवर 22 पेटंट मंजूर

0 second read
0
0
28

no images were found

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला विविध विषयांवर 22 पेटंट मंजूर

कोल्हापूर(प्रतिनिधी) : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने संशोधन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले असून महाविद्यालयाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यानी केलेल्या संशोधनामुळे महाविद्यालयाला 22 पेटंट प्राप्त झाली आहेत. महाविद्यालयाकडून होणाऱ्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील यांनी केले.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील पेटंट मिळवणाऱ्या संशोधकांच्या सत्कार समारंभात डॉ. पाटील बोलत होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थी आणि प्राध्यापकाना संशोधनासाठी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. हे संशोधन समाजभिमुख तसेच उद्योग विश्वाला उपयोगी असावे, त्याच बरोबरच आंतरशाखीय संशोधनाला चालना देणारे असावे याची काळजी महाविद्यालयाचे व्यवस्थापन व संशोधन विभाग नेहमी घेतो. भविष्यामध्येही महाविद्यालय जनरलमधील प्रकाशन,पेटंट समाजाला उपयोगी प्रकल्प, कन्सल्टन्सी या रूपाने संशोधन क्षेत्रामध्ये घोडदौड अबाधित राखेल. संशोधानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे तसेच ते व्यावसायिक रुपात पुढे यावे यासठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, उत्तम अभियंते, उत्तम नागरिक घडवताना कुशल संशोधक घडावेत यासठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. प्रात्यक्षिक व औद्योगिक ज्ञान देतानाच त्याचा उपयोग समाजासाठी व्हावा यावर आमचा विशेष भर असतो. विद्यार्थी व प्राध्यापकांनी केलेल्या या संशोधनाला पेटंटचे कोंदण मिळल्याने अतिशय समाधान वाटत आहे. आमच्या विद्यार्थ्यांमधून भविष्यात चांगले संशोधक घडावेत यासाठी नेहमीच आमचे प्रोत्साहन व पाठबळ राहील.

डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता म्हणाले, मंजूर झालेली पेटंट उद्योग विश्वालाच नाही तर समाजालाही उपयुक्त आहेत. बांधकामामधील झीज ओळखणारी उपकरण, स्तनाचा कर्करोग शोधण्याचे यंत्र, स्टॉक मार्केटमधील व्यवस्थापन करणारी रोबोटिक सिस्टीम, स्मार्ट पोडियम, विहित औषध विक्रीत वितरित करणारे यंत्र, लिकेज शोधणारी उपकरण, फणसाच्या टाकाऊ पदार्थापासून तयार केलेले जलशुद्धीकरण यंत्र, संरक्षण प्रणाली संबंधित, फीक्चर फॉर टीथ गियर, आधुनिक गेअर, स्मार्ट जलशुद्धीकरण उपकरण, पुरावर नियंत्रण ठेवणारे यंत्र, क्ले प्रिंटर, वैद्यकीय विश्वामध्ये लागणारी उपकरणे, आधुनिक औषध वितरण प्रणाली, आयओटी इत्यादी अनेक समाजभिमुख विषयांवर ही पेटंट मंजूर झाली आहेत.

यावेळी अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव म्हणाले, महाविद्यालयाने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संशोधन क्षेत्राशी संबंधित पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क आदी विषयावर विविध कार्यशाळा घेऊन जागरूकता निर्माण केली. या माध्यमातून ४० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक वर्गांचे पेटंट प्रस्ताव पाठविण्यात आले. त्यातील २२ पेटंट मंजूर झाले आहेत. यात १२ डिझाईन पेटंटचा समावेश असून ही पेटंट उद्योग विश्व, स्टार्टअप किंवा व्यवसायामध्ये कशी उपयोगी आणता येतील याविषयीही पुढे कार्यवाही करण्यात येईल.

डॉ. संतोष चेडे, डॉ अमरसिंह जाधव, डॉ. सुनील रायकर, डॉ. मनीषा भानुसे, डॉ. कीर्ती महाजन, डॉ. विनायक पुजारी, डॉ. गणेश पाटील, डॉ, शंकर कोडते, अमृता भोसले, प्रकाश बगाडे, पल्लवी घोलप, शताक्षी कोकाटे, डॉ सुप्रिया पाटील, डॉ.तानाजीराव मोहिते-पाटील, डॉ.प्रशांत जगताप, तरुणा जाधव, स्वरूप यादव, पार्थ पाटील, आल्हाद देशपांडे, शुभम माने यांनी ही पेटंट मिळवण्यासाठी योगदान दिले. डॉ. संजय डी. पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते या पेटंटधारकांचा सत्कार करण्यात आला. या नियोजनासाठी आयपीआर सेल समन्वयक सौ अमृता भोसले व महाविद्यालयाच्या संशोधन विभागाच्या संघाने विशेष परिश्रम घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…