
no images were found
अखिल भारतीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी
विद्यापीठाचा मुलांचा संघ भटिंडाला रवाना
कोल्हापूर ( प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मुलांचा बॉक्सिंगचा संघ गुरु काशी विद्यापीठ पंजाब भटिंडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी रवाना झाला.या स्पर्धा २५ डिसेंबर ते ०२ जानेवारी या कालावधीत भटिंडा पंजाब येथे होणार आहेत.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील विविध विद्यापीठांचे बॉक्सिंग संघ सहभागी होत असतात.आपल्या शिवाजी विद्यापीठातील सातारा,सांगली आणि कोल्हापूर या तीन विभागांमधून विविध वजनी गटांतून जिंकून आलेले संदेश लिंबाजी काटकर,तन्मय सचिन कळंत्रे,राज भगवान पाटील,ऋषिकेश रणवीर घाडगे, प्रेमदास नामदेव शिरोटे,आदित्य सुनील जाधव,ओम उदय इटकर कर,ओम यशवंत हेरूर,सौरभ धनाजी सावंत,प्रणव रमेश रोडे, रामानुज संजय सिंग,सोमराज बाजीराव चौगुले यांची निवड शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघात झाली असून नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे झालेल्या सीनियर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ऋषिकेश रणवीर घाडगे याने ब्रांझ मेडल मिळवले आहे. या संघांमध्ये अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.अखिल भारतीय विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा पूर्व प्रशिक्षण सराव शिबिर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पार पडले.या प्रशिक्षण सराव शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना एन. आय.एस.बॉक्सिंग प्रशिक्षक श्री. रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय,सावळजचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अभिजीत आंबी यांचे मार्गदर्शन लाभले.संघाला मार्गदर्शन करताना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे क्रीडाअधिविभाग प्रमुख संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना बॉक्सिंग या खेळाकडे विशेष लक्ष देऊन ज्या पद्धतीने इतर खेळातील शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी विद्यापीठाचे नाव मोठे केले त्याच प्रमाणे बॉक्सिंग खेळातील खेळाडूंनी आपली कामगिरी करून खेलो इंडिया सारख्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे मत व्यक्त केले. या संघासमवेत प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. अभिजीत आंबी सर यांची निवड करण्यात आली आहे.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या बॉक्सिंग संघामध्ये निवड झालेल्या सर्व खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के, प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील आणि कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे यांचे प्रोत्साहन मिळाले आणि पंजाब येथे उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आजरा महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.धनंजय पाटील सर उपस्थित होते.