
no images were found
न्यू वूमन्स फार्मसीमध्ये ”जागतिक ध्यान दिवस” उत्साहात संपन्न.
कोल्हापूर ( प्रतिनिधी):-येथील श्री.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित,न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी,कोल्हापूर व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक ध्यान दिन” उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात रोपट्यास पाणी घालून करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक व प्रमुख अतिथी आर्ट ऑफ लिव्हींगच्या सौ.ऐश्वर्या पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
मार्गदर्शन करताना,ध्यान केल्याने मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो.त्यामुळे लक्ष आणि एकाग्रता देखील वाढते.निरोगी आरोग्यासाठी ध्यान करणे गरजेचे आहे.दररोज योगा आणि ध्यान केल्याने शरीर आणि मन संतुलित राहते आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहते असे नमूद केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य रविंद्र कुंभार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.यासाठी प्रा.वैष्णवी निवेकर,प्रा.निकिता शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.वैष्णवी निवेकर यांनी मांडले. यावेळी प्रा.पियुषा नेजदार, प्रा.दिव्या शिर्के,प्रा.सुप्रिया अजेटराव, सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.