
no images were found
डॉ. शरद गायकवाड यांची फुले- आंबेडकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड कोल्हापूर :-(प्रतिनिधी) येथील महावीर महाविद्यालयाच्या मराठी विभागात कार्यरत असणारे डॉ. शरद गायकवाड यांची भोर जिल्हा पुणे येथे शनिवार दि .14 व रविवार दि. 15 डिसेंबर या दोन दिवसीय संपन्न होणाऱ्या दहाव्या राज्यस्तरीय फुले, शाहू, आंबेडकर विचार- प्रसार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती आयोजक डॉ. रोहिदास जाधव, भोर यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळविले आहे. डॉ शरद गायकवाड हे महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीवर तज्ञ सदस्य म्हणून जसे कार्यरत आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रकाशन संस्था ,बार्टी, पुणे यांच्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे ग्रंथ प्रकाशन समितीवर देखील तज्ञ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ गायकवाड यांनी यापूर्वी राज्यपाल व मुख्यमंत्री नियुक्त तज्ञ सदस्य म्हणून शासनाच्या लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगावर देखील कार्य केलेले आहे. या साहित्य संमेलनामध्ये संविधान रॅली, ग्रंथदालनाचे उद्घाटन ,जागर संविधानाचा हा काव्य, नाट्य, संगीत, आंबेडकरी शाहिरी जलसा तसेच निमंत्रितांचे कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांनी हे संमेलन संपन्न होणार आहे.