Home क्राईम त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

2 second read
0
0
120

no images were found

त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

कुड्डालोर : तामिळनाडूत आज पहाटे त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर सहा वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाचजणांचा मृत्यू झाला.

या अपघातात कुड्डालोर जिल्ह्यामधील वेयपूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर 2 खासगी बस, 2 लॉरी आणि 2 कार एकमेकांवर वेगात आदळल्या. एएनआयनं कडून मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालकासह एकाच कुटुंबातील 2 महिला आणि 2 मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजतेय.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी त्वरीत दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मृतांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी वेयपूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघाताची नोंद पोलिसांनी केली असून, पुढील कार्यवाही सुरु आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…