Home राजकीय एमसीए अध्यक्ष पदासाठी निवडणुकीत शरद पवारांविरोधात आशिष शेलार ?

एमसीए अध्यक्ष पदासाठी निवडणुकीत शरद पवारांविरोधात आशिष शेलार ?

0 second read
0
0
66

no images were found

एमसीए अध्यक्ष पदासाठी निवडणुकीत शरद पवारांविरोधात आशिष शेलार ?
मुंबई : एमसीए अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या शर्यतीत रंगतदार लढतीची दाट शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये आशिष शेलार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरुद्ध आशिष शेलार मैदानात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या निवडणुकीत राजकीय नेते विरुद्ध क्रिकेटर, असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. कारण शरद पवार गटाकडून एक दिग्गज क्रिकेटपटू या निवडणुकीच्या रिंगणात आधीच उतरलाय. अशातच आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे देखील एमसीए अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे.मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ची येत्या 20 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी माजी आयसीसी आणि बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांचा गट सज्ज झाला असून विविध पदांसाठी या गटाने आपले उमेदवार निश्चित केले आहेत. पवार गटातर्फे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे अध्यक्षपदासाठी उभे राहणार असून उपाध्यक्षपदासाठी नवीन शेट्टी हे रिंगणात आहेत. सचिव पदासाठी तरुण आणि उच्चशिक्षित अजिंक्य नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. सहसचिव पदासाठी गौरव पय्याडे आणि खजिनदार पदासाठी जगदीश आचरेकर हे निवडणूक लढवणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…