
no images were found
पाच वर्ष महिलेच्या पोटात राहिली शस्त्रक्रीयेची कात्री
कोझिकोड: डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची कहर झाली आहे. हर्षिना या महिलावर ५ वर्षा पूर्वी यांचं सिझरेयिन झालं होत. पोटदुखीचा त्रास सुरू होता. गेल्या ६ महिन्यांपासून वेदना अधिकच वाढल्या. यानंतर त्या एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी गेल्या. हर्षिना यांच्या पोटात धातूची वस्तू असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली असता त्यांच्या पोटात शस्त्रक्रीयेची कात्री आढळून आली.
केरळच्या कोझिकोडमध्ये वास्तव्यास असलेल्या ३० वर्षांच्या हर्षिना यांना ५ वर्षांपासून
२०१७ मध्ये हर्षिना यांचं सिझरेयिन झालं. त्या आई झाल्या. त्यावेळी डॉक्टरांनी वापरलेली कात्री हर्षिना यांच्या पोटात राहिली. कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात हर्षिना यांची प्रसुती झाली. पोटात कात्री राहिल्याची कल्पना हर्षिना यांना नव्हती. तेव्हापासून हर्षिना यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. याआधीही दोनदा हर्षिना यांचं सिझर झालं होतं.
तिसऱ्या शस्त्रक्रियेनंतर मला अतिशय जास्त वेदना होऊ लागल्या. सिझेरियन केल्यामुळे त्रास होत असावा असं मला सुरुवातीला वाटलं. मी अनेक डॉक्टरांकडे गेले. मात्र काही दिवसांपासून मला मुत्राशयाजवळ त्रास जाणवू लागला. धातूची वस्तू टोचत असल्याचं वाटू लागलं. त्यामुळे मला संसर्ग झाला. त्यामुळे होणाऱ्या वेदना असह्य होत्या, असं हर्षिना यांनी सांगितलं.
१७ सप्टेंबरला कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी हर्षिना यांच्या पोटातून कात्री बाहेर काढली. या प्रकरणी पाच वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांविरोधात हर्षिना यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोग्य मंत्री विणा जॉर्ज यांनी महिलेची तक्रार लक्षात घेऊन आरोग्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं जॉर्ज यांनी सांगितलं.