
no images were found
शपथविधीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची अनुपस्थिती?
आपण बदल्याचं राजकारण करणार नाही, बदल दिसेल असं राजकारण करू. असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला मात्र विरोधकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे,पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे हे शपथविधीला उपस्थित नव्हते. दरम्यान विरोधी पक्षातील नेते शपथविधीला का उपस्थित नव्हते. याचे कारण खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांबरोबर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला उद्योगपतींसह बॉलिवूडकरांनी हजेरी लावली. मात्र या सोहळ्याला विरोधीपक्षातील एकही नेता उपस्थित नव्हता.
दरम्यान शपथविधी झाल्यानंतर देवेद्र फडणवीस यांनी लगेच कार्यभार संभाळला. त्यानंतर नव्या सरकारची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी सरकारच्या योजनांची आणि महायुती सरकार कशाप्रकारे पुढे कोणत्या योजनांवर काम करणार याची माहिती दिली. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला मनोरंजन आणि उद्योग क्षेत्रातील मंडळी आले होते.
पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या. अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास सांगितले. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल, असे ते अधिकाऱ्यांना म्हणाले.
विरोधी पक्षांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांचा आवाज दाबणार नाही. स्थिर सरकार आम्ही देऊ. असं विधान राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाविषयी केलं. आपण राज्यात बदल्याचं राजकारण करणार नाही, पण बदलाचे राजकारण करणार. परंतु विरोधकांनी त्यांच्या शपथविधीकडे पाठ फिरवली. कॅबिनेटनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना त्याविषयी प्रश्न केला.
त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, शपथविधीसाठी आपण शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकेर, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, यांना फोन केले आणि त्यांना निमंत्रण दिले. परंतु काही व्यक्तिगत कारणामुळं ते आले नाहीत. असं उत्तर फडणवीसांनी दिलं.