
no images were found
सा रे ग म प’ च्या लव्ह यू माँ स्पेशल भागामध्ये परंपरा ठाकूरने आपली संगीत कारकीर्द आपल्या आईला समर्पित!
भारताचा सिंगिंग रिअॅलिटी शो झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’ हा आपल्या कला, मनोरंजन आणि प्रेरणा यांच्या अचूक मिलाफासह प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून जसजसे ह्या स्पर्धेतील वातावरण तापत आहे, तसतसा अख्खा देश आपल्या स्क्रीन्स आणखी खिळून बसत आहे, आपल्या आवडत्या स्पर्धकांसाठी चीअर करत आहे आणि मेंटॉर्स सचिन–जिगर, सचेत परंपरा आणि गुरू रंधावा यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या भावी गायकांच्या कलेला धार येताना पाहत आहे. त्यांचे कसलेल्या परफॉर्मर्समध्ये होणारे रूपांतर पाहणे हा खरंच एक वेगळा अनुभव आहे.
‘सा रे ग म प’ च्या लव्ह यू माँ स्पेशल भागादरम्यान येथील वातावरण अतिशय भावुक झाले कारण सूत्रधार विपुल रॉयने मेंटॉर्सना आपापल्या आईबद्दलच्या हृदयस्पर्शी आठवणी विचारल्या. ह्या भागामध्ये आपल्या मुलांच्या आयुष्याला आकार देण्यामधील त्यांच्या आईचे महत्त्वपूर्ण योगदान साजरे करण्यात आले. परंपरा ठाकूरच्या आपल्या आईसोबतचा संगीतमय प्रवासाने तर सर्वांना हेलावून सोडले. तिच्या आईबद्दल विचारले असता, परंपराने सांगितले की कसा तिचा संगीतमय प्रवास हा अतिशय नाजूकपणे तिची आई संगीता ठाकूरचे अढळ समर्थन आणि मार्गदर्शन यांसोबत जोडला आहे. याबद्दलचे तिचे शब्द ह्या विशेष भागासाठी अगदी अनुरूप होते, आणि त्यातून कलाकारांना ज्यांच्याकडून प्रेरणा मिळते त्यांच्याबद्दलचे त्यांच्या मनातील प्रेम आणि कृतज्ञता यातून व्यक्त झाली.
परंपरा म्हणाली, “मला कधीच वाटले नव्हते की ह्या गोष्टीबद्दल बोलताना मला एवढे भावुक व्हायला होईल आणि तेही एवढे की बोलताना माझ्या आवाजात कंप जाणवेल. माझ्या आईबद्दल बोलण्याची संधी मला फारच कमी वेळा मिळाली आहे. माझ्यामध्ये जे काही संगीत आहे, ते सर्व तिच्यामुळेच आहे. तिचे नावही संगीता आहे आणि ती लहानपणापासून माझी गुरू राहिली आहे. ती एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका आहे आणि तिने मला अमूल्य धडे दिले आहे, केवळ संगीताबद्दलच नव्हेत तर आयुष्याबद्दलही. ती नेहमीच माझ्यासाठी सर्वांसमोर उभी राहिली आहे आणि तिने मला ओरड्यापासून वाचवले आहे आणि कायम माझ्यावर विश्वास ठेवला आहे. ती अनेकदा इतरांना सांगायची, “माझी मुलगी जे काही करेल, ती ते चांगलेच करेल.” आज, मी इथूनच तिला वंदन करते. मी जे काही आहे, माझ्याकडे जे काही आहे ते सगळे तिचेच आशिर्वाद आहेत.”
प्रेक्षक, स्पर्धक आणि मेंटॉर्स तिच्या ह्या हृदयस्पर्शी शब्दांमुळे सद्गदित झाले आणि मातृप्रेम आणि त्याग यांचे ह्या लव्ह यू माँ भागातील साजरीकरण अगदी संस्मरणीय ठरले. एवढेच नाही तर याचसोबत सर्व टॉप–10 स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस तुमचे मन जिंकतील.