
no images were found
श्रीराम फायनान्सची राहुल द्रविड सोबत प्रेरणादायी मोहीम
मुंबई: श्रीराम ग्रुपची प्रमुख कंपनी असलेली तसेच भारतातील आघाडीच्या वित्तीय सेवा प्रदात्यांपैकी एक असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने ‘#TogetherWeSoar’ ही प्रेरणादायी नवीन ब्रँड मोहीम सुरू केली आहे. श्रीराम फायनान्सची ही मोहीम, एकतेची शक्ती अधोरेखित करत, महत्त्वाकांक्षी भारतासोबत भागीदारी करण्याच्या वचनबद्धता प्रतिबिंबित करते.
आज, अनेक भारतीय ‘मग, काय?’ तत्त्वज्ञान स्वीकारत आहेत, जे त्यांच्या यशाच्या प्रवासातील कोणत्याही आव्हानांवर मात करण्याची आकांक्षा प्रतिबिंबित करत आहेत. राहुल द्रविडच्या स्वतःच्या आयुष्याचे काही अंश घेऊन, या मोहिमेचा उद्देश हा उत्साह साजरा करणे आणि भागीदारीला पुढे जाण्याचे साधन म्हणून दाखवणे आहे.
संदेश स्पष्ट आहे: “एकत्र येऊन आपण भरारी घेऊ शकतो’. आम्ही आमच्या ग्राहकांशी मजबूत नातेसंबंध निर्माण करून, त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देत, त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करतो.