
no images were found
डच मेडिकल फ़ूड बी. व्ही आणि प्रिस्टीन पर्ल फ़ार्मा प्रा.लि.द्वारे श्वसन समस्यांकरिता आधुनिक पोषण उपाययोजना सादर
पणजी: डच मेडिकल फ़ूड बी.व्ही ही वैद्यकिय पोषण क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करणारी संस्था असून त्यांनी प्रिस्टीन पर्ल फ़ार्मा प्रा.लिमिटेड सह एकत्र येत भारतात होत असलेल्या नॅशनल पल्मनरी कॉन्फ़रन्स (एनएपीसीओएन) २०२४ मध्ये श्वसन समस्या असणाऱ्यांकरिता विशेष पोषण असलेल्या उत्पादनांची घोषणा केली आहे.
या कल्पक उपाययोजनांची निर्मीती ही क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मनरी डिझीज (सीओपीडी)आणि इतर श्वसन समस्यांमध्ये पूरक म्हणून उपयोगास आणता येणार असून यामुळे अशा आजारपणांमध्ये उद्भवणाऱ्या गंभीर अशा पोषण समस्यांवर तोडगा मिळणार आहे, बरे होण्यावरती उत्तम परिणाम आणि आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळणार आहे. सीओपीडीचा समस्यांना सुमारे ५५.३ दशलक्ष भारतीयांना सामोरे जावे लागत असून, हा आजारपण आणि मृत्युस कारणीभूत असलेल्या महत्वाचा आजारांपैकी एक आहे; शिवाय या आजारांमुळे पोषणावर गंभीर परिणाम होतात आणि अगदी कुपोषणासमान आरोग्य खालावू शकते.
सीओपीडी असलेल्या रूग्णांना बऱ्याचदा पोषणाची कमतरता जाणवू शकते, ज्यामुळे स्नायूंचा ऱ्हास होतो, ऊर्जेचे प्रमाण कमी होते आणि एकूणच आरोग्य खालावते. “सीओपीडीसारख्या श्वसन समस्यांमुळे तीव्रप्रमाणात पोषणाची कमतरता जाणवू शकते ज्यामुळे पोषणाचा समस्या होतात आणि एकूणच रूग्णाचे स्वास्थय आणि प्रतिकारशक्ती कमी होते,” असे डॉ. गुरू रामनाथन,म्हणाले जे डच मेडिकल फ़ूडचे सह-संश्थापक आहे. “ आमचा उपाययोजनांमुळे योग्य उपचारासह पोषक घटकांचे सहाय्य रूग्णाला मिळते आणि मग आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत मिळते.”
या लॉन्च मुळे भारतात आजारांमुळे उद्भवणाऱ्या पोषणाची घट ही वैयक्तिक पोषणाचा पुर्ततेसह पूर्ण करण्याचा एका नवीन पर्वाची सुरवात झाली आहे. “ एनएपीसीओएनने केलेल्या या उपाययोजनांमुळे, आम्हाला भारताच्या आरोग्यसेवा व्यावसायिकांकरिता परिणामकारक अशा पोषण साधनांची निर्मीती करून द्यायची आहे, ज्यामुळे उपचारांमध्ये अधिक चांगली सुलभता त्यांना मिळू शकेल.” असे डच मेडिकल फ़ूडचे सह-संस्थापक डॉ. रॉल्फ़ स्मीट्स म्हणाले.