Home सामाजिक १४ डिसेंबर ते १८ डिसेंबरला पुण्यात किसान अॅग्री शो

१४ डिसेंबर ते १८ डिसेंबरला पुण्यात किसान अॅग्री शो

13 second read
0
0
37

no images were found

१४ डिसेंबर ते १८ डिसेंबरला पुण्यात किसान अॅग्री शो

पुणे येथे होणाऱ्या कृषी प्रदर्शनात बॅलर (गवत बांधण्याचे यंत्र) आणि हार्वेस्टर (कापणी यंत्र) सह ट्रॅक्टरचे वेगवेगळे प्रकार न्यू हॉलंड शेतकऱ्यांना पाहण्यासाठी  ठेवणार आहे.

पुणे : सीएनएच इंडस्ट्रियल चे एक ब्रॅंड न्यू हॉलंड अॅग्रीकल्चर १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान पुणे येथे होणाऱ्या ३१ व्या किसान अॅग्री शो २०२२ मध्ये आपली वेगवेगळी उत्पादने प्रदर्शित करणार आहे. कृषी क्षेत्रात संशोधन करण्यात अग्रगण्य असलेल्या आणि कृषी विषयक शैक्षणिक संस्थांचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी मैदानात या व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात न्यू हॉलंड अॅग्रीकल्चर ग्राहकांसाठी १०० हून अधिक ट्रॅक्टर देखील प्रदान करेल.

कंपनी मेळावा पाहायला आलेल्यांसाठी त्यांनी नुकतेच बाजारात आणलेले ब्ल्यू सिरिज सिम्बा 30 कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर प्रदर्शित करणार आहे. त्याशिवाय, न्यू हॉलंड 3032, 3230 4 डब्लू डी, 3037, 3600-2 एक्सेल  , 3600, 4710 4 डब्लू डी, 3630, 5510, 5620, 3230 टीएक्स सुपर आणि  3037 टीएक्स सुपर हे अन्य ट्रॅक्टरस् चे मॉडेलस् सुद्धा तेथे ठेवण्यात येतील. ऊस कापणी यंत्र (शुगरकेन हार्वेस्टर) आणि स्क्वेअर बेलर यांसारख्या कंपनी आणि पीक अवशेष व्यवस्थापन अवजारे देखील कंपनी कडून या मेळाव्यात प्रदर्शित केली जातील. याशिवाय, संभाव्य ग्राहकांना कोणतीही कृषी अवजारे आणि उपकरणे त्याच वेळी प्रदर्शनात विकत घेण्यासाठी कंपनी फायदेशीर अशा वित्तीय सवलती देखील देऊ करेल.

यावेळी बोलताना सीएनएच इंडस्ट्रियल च्या कृषी ब्रॅंड इंडिया चे संचालक श्री गगन पाल म्हणाले की, “न्यू हॉलंड अॅग्रीकल्चर आपल्या कल्पक, आधुनिक  इंधन कार्यक्षम आणि बहुमुखी आणि वैविध्यपूर्ण मशिनींसह एक सर्वसमावेशक व संपूर्ण कृषी व्यवस्थापन पुरविते. या किसान अॅग्री शो मध्ये आमची विविध कृषी यांत्रिकीकरण उपकरणे व अवजारे प्रदर्शित करताना आम्हाला फार आनंद होत आहे. महाराष्ट्र ही आमच्या साठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आम्हाला आशा आहे की, विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांच्या विस्तृत नेटवर्क मध्ये सामील होऊ. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या मशिनींच्या व्यापक श्रेणींमुळे प्रदर्शनात येणारे प्रेक्षक केवळ उत्साहीच होतील असे नाही तर शेतकऱ्यांना त्यांची कामे अधिक उत्पादनक्षम आणि कार्यक्षम बनविण्यातही याचा फायदा होईल.”

किसान अॅग्री शो हा एक वार्षिक शेतीविषयक मेळावा आहे; ज्याचे उद्दिष्ट कृषी व्यावसायिक, धोरण कर्ते, समविचारी व्यक्ती, सरकारी अधिकारी आणि भारताच्या सर्व भागातील शेतीशी संबंधित माध्यमांना एकत्र आणून त्या  सर्वांमध्ये संवाद घडवून आणणे हे आहे. हे ३१ वे किसान अॅग्री शो असून या वर्षी शेतकरी प्रत्यक्ष मेळाव्याबरोबरच वेबसाइट आणि मोबाइल अॅप द्वारे सुद्धा पाहू शकत असल्याने हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा मेळावा असल्याचे मानले जाते. न्यू हॉलंड अॅग्रीकल्चरचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनक्षम, कार्यक्षम आणि प्रभावी पद्धतीने शेती करण्याच्या प्रवासात उत्कृष्ट व कार्यक्षम तंत्रज्ञान असलेल्या उत्पादनांसह  सहाय्य करणे ही आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…