Home आरोग्य मेडिक्स ग्लोबल आणि एम्पॉवर यांची भागीदारी भारतामध्ये

मेडिक्स ग्लोबल आणि एम्पॉवर यांची भागीदारी भारतामध्ये

19 second read
0
0
41

no images were found

मेडिक्स ग्लोबल आणि एम्पॉवर यांची भागीदारी भारतामध्ये

भारतीयांना आपले मानसिक आरोग्य अधिक चांगले ठेवता यावे यासाठी तंत्रज्ञान/डिजिटल उपाय उपलब्ध करवून देण्याबरोबरीनेचआरोग्यापुरक चर्चांना प्रोत्साहन देण्यासाठीची ही भागीदारी भारतातील युवा पिढ्यांना मानसिक सहायता सेवांचा जास्तीत जास्त उपयोग करवून घेण्यासाठी प्रोत्साहन देईल.

 मुंबई : मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये संपूर्ण जगभरात वाढ होत आहेमहामारीच्या काळात आणि त्यानंतर यामध्ये वेगाने वाढ होत आहे.  मेडिक्स ही जागतिक पातळीवरील आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनी असूनलाखो ग्राहकांच्या आरोग्यविषयक गरजांवर प्रभावी उपाययोजना पुरवते. ३०० पेक्षा जास्त इन-हाऊस फिजिशियन्स आणि जागतिक पातळीवरील आघाडीच्या ४५०० पेक्षा जास्त विशेषज्ञांचे गुणवत्ता प्रमाणित नेटवर्क असलेल्या या कंपनीने आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा एक उपक्रम आणि भारतात मानसिक आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एम्पॉवरसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. एम्पॉवरसोबत ६०० पेक्षा जास्त अनुभवी मानसिक आरोग्य प्रोफेशनल्स काम करत असून ते जागतिक दर्जाचीवैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली उपाय तंत्रे पुरवतातज्यांनी आजवर १२१ मिलियनपेक्षा जास्त व्यक्तींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव निर्माण केला आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून एम्पॉवर आणि मेडिक्स भारतात मानसिक आरोग्य सेवा अधिक जास्त सहजपणे उपलब्ध करवून देण्यासाठी एकीकृत व प्रगत तंत्रज्ञान उपाययोजना पुरवणार आहेत.

या धोरणात्मक भागीदारीचा एक भाग म्हणून मेडिक्स इंडिया एम्पॉवरच्या मानसिक आरोग्य सेवांना आपल्या विविध मूलभूत कार्यक्रमांमध्येग्राहकांना दिल्या जात असलेल्या सेवांमध्ये समाविष्ट करवून घेईलत्यांच्या ग्राहकांमध्ये आघाडीच्या विमा कंपन्याकॉपोरेट कंपन्या आणि इतर हितधारकांचा समावेश आहेत्यांना एम्पॉवर क्लिनिक्स व व्हर्च्युअल मानसिक आरोग्य सेवांचा लाभ घेता येईल. या भागीदारीमधील ज्ञानमाहिती आणि सेवा भागीदार म्हणून एम्पॉवर मानसिक आरोग्य क्षेत्रातील आपले नैपुण्य वापरूनमानसिक आरोग्य सहायता मिळवण्यासाठी आलेल्या रुग्णांना आजवर सिद्ध झालेल्या विविध मानसिक आरोग्य उपाययोजना आणि थेरपीज उपलब्ध करवून देईल. मेडिक्स गुणवत्तेची खात्रीलक्ष्य निश्चित करण्याची धोरणेक्लिनिकल उपायडिजिटल मानसिक आणि शारीरिक मूल्यांकने आणि परिणाम मोजण्यासाठी नाविन्यपूर्ण उपकरणेविश्लेषण इत्यादी उपलब्ध करवून देईल. भारतातील आजवरच्या मानसिक आरोग्याच्या देखभालीकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये अशाप्रकारे नवपरिवर्तन घडवून आणले जाईल.

मानसिक आरोग्य ही भारतातील सध्याची खूप गंभीर समस्या आहेखासकरून युवा पिढीमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्ल्ड मेंटल हेल्थ रिपोर्ट २०२२ नुसारगंभीर मानसिक आरोग्य समस्या असलेल्या व्यक्ती इतर सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा १० ते २० वर्षे आधी जीव गमावतात. बऱ्याचदा हे मृत्यू सहज टाळता येण्याजोग्या शारीरिक आजारांमुळे होतात. “मेंटल हेल्थ अँड वेलंबींग इन द वर्कप्लेस” या डेलॉइटच्या २०२२ सर्व्हेनुसारगेल्या वर्षी भारतातील ८०% कर्मचाऱ्यांनी त्यांना मानसिक आरोग्य समस्या असल्याचे सांगितले होते.  ही इतकी गंभीर आकडेवारी दिसत असताना देखील सामाजिक गैरसमजुती आणि कलंकांमुळे जवळपास ३९% व्यक्ती उपचार करवून घेत नाहीत.  या भागीदारीमध्ये एम्पॉवर आणि मेडिक्स हे २०२३ पासून भारतात मानसिक आरोग्य सेवा अधिक चांगल्याप्रकारे, अधिक सहजपणे उपलब्ध करवून देण्यासाठी वचनबद्ध आहेत!

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…