no images were found
महानगरपालिकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्य विविध कार्यक्रम
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सुवर्ण महोत्सव वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी दि. 15 डिसेंबर 2022 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजता कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे चौकात प्रशासक डॉ.बलकवडे यांचे शुभहस्ते ध्वजारोहन करुन विविध कार्यक्रमाची सुरवात होणार आहे.
ध्वजारोणानंतर महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे सकाळी 9.15 वाजता वीर मात,वीर पिता व वीर पत्नी यांचा सत्कार, स.9.45 वाजता आरोग्य विभागाकडील उत्कृष्ट काम करणा-या सफाई कर्मचा-यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सफाई कर्मचा-यांसाठी काम करताना रिफ्लेक्टींग जॅकेट व सुरक्षा सिाहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यानंतर महिला व बाल कल्याण समितीच्यावतीने सकाळी 10.15 वाजता इयत्ता 10 वी परिक्षेमध्ये अव्वल गुणांनी उत्तीर्ण झालेल्या 66 विद्यार्थींनींचा सत्कार करण्यात येणार आहे. अग्निशमन विभागात उल्लेखनीय काम करणा-या कर्मचा-यांचा व पूरपरिस्थितीत, कोवीड कालावधीमध्ये बहुमोल योजदान दिलेल्या स्वयंसेवी संस्थांचा सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर स्वच्छता व पर्यावरण विषयक जनजागृतीपर प्रभात फेरी, रा.जि.ग.हायस्कुल येथे शाळेच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहिम व सर्व विद्यार्थांच्या समोर प्लस्टीकमुक्तीवर गीत सादर केले जाणार आहे. तसेच प्राथमिक शिक्षण समितीकडील सर्व शाळांमध्ये विविध विषयांवर शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या सर्व रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे व कुटुंब कल्याण केंद्रांच्या ठिाकणी सकाळी 8 ते 2 पर्यंत वैद्यकिय मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाच्या प्रधान कार्यालय येथे रक्तदान शिबीर व पाणी वाचविणे बाबतची जलदिंडी महापालिका चौकातून बिंदू चौक ते छ.शिवाजी चौक या मार्गावरुन काढण्यात येणार आहे. तसेच के.एम.टी.च्या वतीने महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शहरातील ऐतिहासिक स्थळांची भेटी दिल्या जाणार आहे.
दि. 17 डिसेंबर रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे दिव्यांगासाठी गीत गायन, नृत्य, एकांकीका, नाटीका, प्रबोधनात्मक भाषण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 24 व 25 डिसेंबर रोजी सासणे, मैदान ताराबाई पार्क येथे दुपारी 3 ते रात्रौ 10 पर्यत फुड फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे.