Home सामाजिक टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतात १ लाख अर्बन क्रूझर हायरायडर विक्रीचा आनंद साजरा केला

टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतात १ लाख अर्बन क्रूझर हायरायडर विक्रीचा आनंद साजरा केला

14 second read
0
0
5

no images were found

टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतात १ लाख अर्बन क्रूझर हायरायडर विक्रीचा आनंद साजरा केला

बंगळुरू : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज घोषणा केली आहे की, अर्बन क्रूझर हायरायडरने भारतात 1,00,000 युनिट्स विक्रीचा उल्लेखनीय टप्पा पार केला आहे. ही उपलब्धी बी-सुव्हीची मजबूत बाजारपेठ आणि हायब्रिड तंत्रज्ञानाबद्दल भारतीय ग्राहकांच्या वाढत्या स्वीकृतीचे प्रतीक आहे.जुलै 2022 मध्ये लाँच करण्यात आलेली अर्बन क्रूझर हायरायडर टोयोटाच्या जागतिक दर्जाच्या हायब्रिड तंत्रज्ञानाला नाविन्यपूर्ण डिझाइन, प्रीमियम आराम आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेसह एकत्र करतो. हे सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक (एसएचईव्ही), निओ ड्राइव्ह आणि सीएनजी पॉवरट्रेन या तीन पॉवरट्रेन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये 1.5-लिटर इंजिन आहे, जे टीएचएस (टोयोटा हायब्रिड सिस्टम) आणि ई-ड्राइव्ह ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे. यामुळे एकत्रितपणे 85 किलोवॅटची पॉवर आउटपुट मिळते. हायरायडरच्या हायब्रिड सिस्टममुळे बाह्य चार्जिंगची गरज नसते आणि ग्राहकांसाठी नेहमीच सोयीस्कर ठरते. त्याची प्रगत हायब्रिड सिस्टम सुरळीत आणि शांत ड्राईव्ह अनुभव देते, ज्यामध्ये त्वरित पॉवर डिलिव्हरीची सुविधा आहे. उत्कृष्ट प्रतिसादक्षम कार्यक्षमता आणि शांत ऑपरेशनमुळे, पर्यावरणपूरक आणि गतिशील ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो. याव्यतिरिक्त, बहुपयोगिता आणि पॉवर शोधत असलेल्या ग्राहकांनी देखील निओ ड्राइव्ह पॉवरट्रेनचा अवलंब केला आहे, ज्यामध्ये पर्यायी ऑल-व्हील ड्राइव्ह (एडब्ल्यूडी) सिस्टम उपलब्ध आहे. जे शहरी प्रवास आणि कठीण मार्गांवर देखील एक उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव देते.अर्बन क्रूझर हायरायडर उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेसह प्रगत सुविधा आणि कार्यक्षमतेचे वैशिष्ट्ये एकत्रित करून विशिष्ट मूल्य देण्यासाठी डिझाइन केले आहे. शाश्वत गतिशीलतेसाठी टीकेएमच्या वचनबद्धतेचे प्रतीक असलेला, हा सेल्फ चार्जिंग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल व्हेरियंटमध्ये 27.97 किमी/लिटर*, निओ ड्राइव्ह (एमटी) व्हेरियंटमध्ये 21.12 किमी/लिटर* आणि सीएनजी मोडमध्ये 26.6 किमी/किलोग्राम पर्यंत एसयूव्ही श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज देते.

या यशाबद्दल भाष्य करताना, श्री. सबरी मनोहर – व्हाईस प्रेसिडेंट, सेल्स-सर्व्हिस-युज्ड कार बिझनेस, टोयोटा किर्लोस्कर मोटर म्हणाले, “अर्बन क्रूझर हायरायडरला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद हा भारतीय ग्राहकांच्या बदलत्या पसंतीनुसार नाविन्यपूर्ण मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करण्याची आमची बांधिलकी दर्शवतो. हा महत्त्वाचा टप्पा फक्त एक आकडा नाही; ही एसयूव्ही तंत्रज्ञानाच्या एका नवीन युगाची सुरुवात आहे, ज्यामध्ये टिकाऊपणा, कार्यक्षमता आणि ग्राहक समाधानाला प्राधान्य दिले आहे. अर्बन क्रूझर हायरायडरने नवकल्पना आणि पर्यावरणीय जागरूकतेद्वारे बदल घडवण्याची टोयोटाची परंपरा कायम ठेवली आहे आणि आमच्या ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. या टप्प्यावर पोहोचण्यात मदत करणाऱ्या आमच्या ग्राहकांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो.”      

अर्बन क्रूझर हायरायडरचे यश आणि बाजारपेठेतील स्वीकृती टोयोटाच्या उत्कृष्ट आणि उद्योगात आघाडीवर असलेल्या सेवा सुविधामुळे आणखी वाढली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) “टी केअर” अंतर्गत सर्वसमावेशक सेवा ऑफर करते, जी ग्राहकांना आनंद देण्यासाठी आणि दीर्घकालीन संबंध मजबूत करण्याची कंपनीची वचनबद्धता दर्शवते. प्री-सेल्सपासून ते विक्रीनंतर आणि पुन्हा खरेदीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असलेली “टी केअर” ही एकात्मिक सेवा ब्रँड आहे, ज्यात टी डिलिव्हर, टी ग्लॉस, टी असिस्ट, टी साथ, टी सिक्योर, टी चॉईस, टी इन्स्पेक्ट, टी स्माईल आणि इतर अनेक सेवा समाविष्ट आहेत.अलीकडेच, टोयोटा किर्लोस्कर मोटरने इनोव्हा हायक्रॉसच्या 1,00,000 युनिट्स विक्री करण्याचा टप्पा साजरा केला, जो भारतीय ग्राहकांनी ब्रँडवर ठेवलेला प्रचंड विश्वास दर्शवतो. हायरायडरच्या या नवीन टप्प्याचा आनंद साजरा करताना, डायनॅमिक भारतीय ग्राहकांच्या आकांक्षांच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण आणि विश्वासार्ह उत्पादने देण्यासह भारतात टिकाऊ गतिशीलतेच्या पुनःनिर्धारणासाठी कंपनी वचनबद्ध आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यां…