no images were found
न्यू वूमन्स फार्मसी मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील, प्रिन्स शिवाजी मराठा बोडिग हाऊस संचलित,न्यू वूमन फार्मसी मध्ये संविदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाची सामुहिक शपथ घेतली. यावेळी संविधानाची गरज, महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संविधान दिवस त्याचे महत्त्व विषद करताना देशातील नागरिकांनामध्ये संविधानिक मुल्याबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा उपदेश आहे. भारतातील विविध धर्म, जाती, आणि करोडो लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. डाँ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहेत. या संविधानाचा गौरव करण्यासाठी आपण हा दिवस प्रत्येक वषी साजरा करतो असे नमूद करण्यात आले. यावेळी यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.वैष्णवी निवेकर,प्रा. पियुषा नेजदार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रा. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. सदरचा उपक्रम काँलेजचे प्राचार्य .रविंद्र कुभार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.