Home Uncategorized सायकी- 16 या लघुग्रहावर 2026 ला NASA चे यान पोहचणार!

सायकी- 16 या लघुग्रहावर 2026 ला NASA चे यान पोहचणार!

12 second read
0
0
24

no images were found

सायकी- 16 या लघुग्रहावर 2026 ला NASA चे यान पोहचणार!

नासाच्या संशोधकांना ब्रम्हांडात सोन्याने भरलेला ग्रह सापडला आहे. या ग्रहावरील सोनं पृथ्वीवर आणलं तर पृथ्वीवरील प्रत्येक माणूस करोडपती होईल. असे संशोधकांचे मत आहे.
अनेक जण सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. मात्र, सोन्याचे दर हे अवाक्याबाहेर गेल आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांसाठी बजेट बाहेरची गोष्ट बनली आहे. जगभरात अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत. तरी देखील दिवसेंदिवस सोन्याचे मूल्य वाढत आहे. अशातच ब्रम्हांडात सोन्याचे भंडार सापडले आहे. हे सोन्याचे भंडार म्हणजे गोल्ड प्लॅनेट आहे. हा ग्रह सोन्याने भरलेला आहे. या ग्रहावरचं सर्व सोनं पृथ्वीवर आणलं तर प्रत्येक माणसाच्या वाट्याला 10 हजार कोटी रुपये येतील. हे सोनं पृथ्वीवर आणणे शक्य आहे का? जाणून घेऊया.सध्या जगभरातील संशोधक परग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. संशोधक विविध ग्रहांचा अभ्यास करत आहेत. अशातच संशोधकांना एक असा ग्रह सापडला आहे जिथे मोठ्या प्रमाणात सोन्यासारखा मौल्यवान धातू आढळून आहे आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा जास्त सोनं या ग्रहावर आहे.
संशोधनादरम्यान संशोधकांना हा लघुग्रह आढळला आहे. 17 मार्च 1852 रोजी इटालियन खगोलशास्त्रज्ञ एनिबेल डी गॅस्पॅरिस यांनी या ग्रहाचा शोध लावला. सायकी- 16 (16Psyche Gold Planet) असे या ग्रहाचे नाव ठेवण्यात आले आहे. हा ग्रह सूर्यमालेतच असून तो सूर्याभोवती फिरत आहे. हा लघु ग्रह सूर्याभोवती मंगळ आणि गुरू यांच्या कक्षेमध्ये फिरत आहे. बहुतेक लघुग्रह खडक, बर्फ किंवा या दोघांच्या मिश्रणाने बनलेले असतात. मात्र,या लघुग्रहावर मोठ्या प्रमाणात धातूचा साठा आढळला आहे. निरीक्षणादरम्यान या ग्रहावर प्लॅटिनम, सोने आणि इतर धातू मोठ्या प्रमाणात आहेत. 16Psyche Gold Planet या ग्रहाचे आकारमान 226 किलोमीटर एवढंच आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो. या लघुग्रहावर एक दिवस 4.196 तासांचा असतो. या ग्रहाचे वजन पृथ्वीच्या चंद्राच्या वजनाच्या फक्त 1 टक्के आहे. 12 ऑक्टोबर 2023 रोजी ‘स्पेसएक्स’ने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून NASA Psyche यान अवकाशात झेपावले. 2026 पर्यंत हे यान 16Psyche Gold Planet वर पोहोचणार होते. ऑगस्ट 2029 मध्ये Psyche spacecraft या सोन्याच्या लघुग्रहावर पोहचणार आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) मधून या अवकाशयानाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. नासाचे Psyche spacecraft मॅग्नेटोमीटर वापरून या ग्रहाच्या चुंबकीय शक्तीचे मोजमाप करणार आहे.
या ग्रहावर एवढं लोह म्हणजे लोखंड आणि इतर मौल्यवान धातू आहेत की ते विकल्यावर 10 हजार क्वाड्रिलीयन पौंड मिळतील. म्हणजेच 10 हजार या संख्येच्या मागं पंधरा शून्य एवढे पैसे मिळतील. याच हिशोबानं पृथ्वीवरील प्रत्येक माणसाच्या वाट्याला 10 हजार कोटी रुपये मिळतील.या ग्रहावर 700,000,000,000,000,000,000 म्हणजेच 700 क्विंटिलियन डॉलर्स ऐवढ्या किंमतीचे सोनं असल्याचा दावा केला जात आहे. सायकी- 16 वरील मौल्यवान धातू पृथ्वीवर आणणं सध्या तरी अशक्य आहे. यामुळे संशोधकांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येकांचे ‘एकला चलो रे’! इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येकांचे ‘एकला चलो रे’! इंडिया अगेन्स्ट …