no images were found
भादवण प्राथमिक आरोग्य केंद्रात 22 नोव्हेंबरला मानसिक आरोग्य व ताणतणाव व्यवस्थापन शिबीर
कोल्हापूर : राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत आजरा तालुक्यातील भादवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर 2024 रोजी मानसिक आरोग्य व ताणतणाव व्यवस्थापन शिबीर सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित केले आहे. शिबीरामध्ये मोफत तपासणी, समुपदेशन व औषधोपचार मिळणार असून नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अर्पणा कुलकर्णी यांनी केले आहे.
शिबीरामध्ये स्किझोफ्रेनिया संशय येणे, विचित्र वर्तन, कानात आवाज, मेनिया, हर्षवायू, अती उत्साहीपणा, एक कृती वारंवार करणे, विचार कृती अनिवार्य विकृती, नैराश्य, उदासिनता, आत्महत्येचे विचार येणे, व्यसन (दारु, तंबाखू, मावा, गुटखा, मोबाईल, गेम), स्मृतीभ्रंश, विसरभोळेपणा, प्रसुतीपश्चात नैराश्य, उदासिनता, झोपेसंबंधी समस्या, चिंता, भिती, काळजी वाटणे, एन्युरेशीस (वयाच्या 5 वर्षानंतरही अंथरुणामध्ये लघवी करणे), शाळेत जाण्याची भिती, शाळा बुडविणे, पटकन राग/चिडचिड करणे, हट्टीपणा, अभ्यासाचा कंटाळा, परिक्षेची भिती वाटणे, स्वमग्न, अतिचंचलपणा, एकलकोंडेपणा, आत्मविश्वास कमी होणे, ताण – तणाव व्यवस्थापन अशा समस्या भेडसावत असल्यास यावर मोफत तपासणी, समुपदेशन व औषधोपचार मिळणार आहे. अधिक माहितीसाठी टेलिमानस टोल फ्री क्रमांक – 14416/ 18008914416 आहे.