no images were found
चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे स्थानिक भाषेमध्ये : एकनाथ काळबांडे
कोल्हापूर : चंदगडमध्ये मतपत्रिकेवर उमेदवार नावे स्थानिक भाषेतील कन्नडमध्ये छापल्याबाबत जिल्ह्यातील माध्यमामध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु मतदारसंघातील उमेदवारांची नावे भारत निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच कन्नड भाषेमध्ये प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती 271 चंदगड विधानसभा संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज विभाग एकनाथ काळबांडे यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या हस्त पुस्तिका 2023 मध्ये जोडपत्र 15 चे अवलोकन केले असता 271 चंदगड विधानसभा मतदारसंघात नमुना 7 अ मराठी व कन्नड भाषेमध्ये प्रसिध्द करण्याबाबत नमुद केलेले असल्याने 271 चंदगड विधानसभा मतदारसंघात नमुना 7 अ मराठी व कन्नड भाषेमध्ये प्रसिध्दी करण्यात आलेला आहे.
मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य याच्याकडील दि. 22 ऑक्टोबर 2024 मध्ये निवडणूक लढवण्याऱ्या उमेदवार यांची यादी नमुना 7 अ मध्ये तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यामधील सूचना क्र. 7 नुसार भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकरीता हस्त पुस्तिका 2023 मध्ये जोडपत्र 15 च अवलोकन करण्यात आले. त्यानुसार 54 मतदारासघांचे नमुना क्र. 7 अ मधील यादी मराठी व इंग्रजीमध्ये, 10 मतदारसंघाची नमुना 7 अ मधील यादी मराठी व उर्दू मध्ये,05 मतदार संघाची नमुना 7 अ मधील यादी इंग्रजी, मराठी व उर्दू मध्ये, 05 मतदारसंघातील नमुना 7 अ मधील यादी मराठी व कन्नड मध्ये व उर्वरित 214 मतदारसंघाची नमुना 7 अ मधील यादी केवळ मराठी मध्ये तयार करण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसारचे निवडणूक प्रक्रियेचे कामकाज सुरु असल्याचे 271 चंदगड विधानसभा संघाचे निवडणूक निर्णय अधिकार तथा उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज विभाग एकनाथ काळबांडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.