no images were found
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन शेतकरी नोंदणी करण्याचे आवाहन
कोल्हापूर : आधारभूत किंमत खरेदी योजना 2024-25 अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करीता शेतक-यांनी दि. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत खरेदी केंद्रावर समक्ष जाऊन नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी गजानन मगरे यांनी केले आहे.
आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्यादित तालुका आजरा (केंद्र-आजरा), कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर (केंद्र कोल्हापुर मार्केट यार्ड), श्री अन्नपुर्णा सह. सोयाबीन खरेदी विक्री संस्था मर्या व्हनाळी (केंद्र-कागल) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी नोंदणी सुरु आहे.
शासनाने FAQ प्रतीच्या सोयाबीन साठी 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणी करिता शेतक-यांचा चालु (2024-25) हंगाम मधील ऑनलाईन सोयाबीन पिकपे-याची नोंद असलेला 7/12 उतारा, आधार कार्डची झेराक्स, बँक पासबुक आवश्यक आहे. संबंधित ठिकाणी जाऊन नोंदणी करणे गरजेचे असुन नोंदणीकृत शेतक-यांची FAQ मालाची खरेदी करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, शाहु मार्केट यार्ड कोल्हापुर येथे संपर्क करावा असेही श्री. मगरे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.