
no images were found
हिंदूत्ववादी संघटनेच्यावतीने सोमवारी ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रम
कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी सायं.६.०० ते रात्री १०.०० या वेळेत “दैवज्ञ बोर्डिंग, मंगळवार पेठ, कोल्हापूर” येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचा ७५ व्या अमृत महोत्सवही यामध्ये साजरा केला जाणार आहे. याबाबत आज शिवालय, शिवसेना शहर कार्यालय, कोल्हापूर येथे समस्त हिंदू धर्म संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांची पत्रकार परिषद पार पडली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील हिंदूजणांना व घटकांना एकत्र आणण्यासाठी व हिंदू धर्माचा वसा जपण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, शहरातील तालीम संस्था, मंडळाचे कार्यकर्ते, समस्त नागरिक आणि हिंदू जणांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही समस्त हिंदू धर्म संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस महादेवजी यादव महाराज, बाबा वाघापूरकर, हिंदुराव शेळके, चंद्रकांत बराले, सुधीर जोशी, अशोक रामचंदानी, शामराव जोशी, नंदू घोरपडे, श्रीपाद मराठे, मनोहर सोरप, कमलाकर किलकिले, किशोर घाटगे, महेश उरसाल, पराग फडणीस आदी हिंदुत्ववादी संघटनांचे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.