no images were found
चंद्रकांत चौगले यांची संचालकपदी निवड
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील नंबर 2 ची संस्था म्हणून ओळखाल्या जाणाऱ्या जोतिर्लिंग दूध व्यावसायिक संस्था, सिरसे संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. अनेक वर्षे या संस्थेमध्ये (कै.) रंगराव कृष्णाजी पाटील ( आण्णा) यांच्या गटाची सत्ता असून संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी अण्णांच्या गटाचे चंद्रकांत दौलू चौगले यांची निवड करण्यात आली.
निवडीदरम्यान संस्थेचे चेअरमन वसंत रंगराव पाटील व संस्थेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब कुरणे, श्री शि. ना. पाटील (सर), संचालक श्रीपती ना पाटील, दिनकर चौगले, भगवान भाटले, शामराव मोरबाळे, सेक्रेटरी दिनकर पाटील व तुकाराम पाटील, सुरेश पाटील, एकनाथ चौगले, सुनील चौगले, सागर चौगले, कृष्णात चौगले व कर्मचारी वाकोजी पाटील, श्रीकांत कुरणे उपस्थित होते. स्वागत शि. ना. पाटील (सर) यांनी तर सुरेश चौगले यांनी आभार मानले.