Home शासकीय उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी सुट्टी

उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी सुट्टी

13 second read
0
0
92

no images were found

उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी सुट्टी

 

मुंबई : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार, निवडणूक क्षेत्रातील कोणत्याही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांत काम करणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. तसेच पोटकलम (१) नुसार या सुट्टीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्यास, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने नमूद केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बाबूजींचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचं नातं; भरभरुन प्रेम दिल्याबद्दल कोल्हापूरकरांना धन्यवाद ! – ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके

बाबूजींचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचं नातं; भरभरुन प्रेम दिल्याबद्दल कोल्हापूरकरांना धन्यवाद …