Home सामाजिक कोकणात उडणार आता पर्यटनाचे नवीन द्वार

कोकणात उडणार आता पर्यटनाचे नवीन द्वार

4 second read
0
0
35

no images were found

कोकणात उडणार आता पर्यटनाचे नवीन द्वार

 

कोल्हापूर – दापोली हे पर्यटनस्थळ म्हणून हळुहळू जगाच्या पर्यटन नकाशावर येऊ पाहतेय. प्राचीन पन्हाळेकाजी लेणी,ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ला,कड्यावरचा गणपती,गुहेतली चंडिका देवी मंदीर, गरमपाण्याचे झरे, अशा विविध पर्यटनस्थळांबरोबरच स्वच्छ आणि सुंदर असे समुद्रकिनारे ही दापोलीतली पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणं आहेत.

दापोलीतील राॅयल गोल्डफिल्ड क्लब रिसाॅर्ट या नावाने कार्यरत असणार्‍या संस्थेचे जागतिक दर्जाचे क्रिकेट ग्राउंड आणि त्यात असलेले 50000 स्क्वेअरफुटाचे आधूनिक सर्वसोयींनी युक्त असे क्लब हाऊस म्हणजे दापोलीच्या पर्यटनाच्या मुकुटमणी ठरतोय.

उत्तमोत्तम खेळाडू निर्माण व्हावेत या मुख्य हेतूने प्रेरीत या क्लब हाऊस व स्टेडियमचे अनेक भारतीय आणि जागतिक स्तरावरील क्लब बरोबर संलग्नता असल्याने अनेक प्रतिभावंत खेळाडूंसाठी भारतातच नव्हे तर अगदी जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून दिली आहे.

याच अनुषंगाने राॅयल गोल्डफिल्ड क्लब रिसाॅर्टने महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी स्मिता हाॅलिडेज या संस्थेबरोबर संयुक्तपणे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स फेस्टिव्हल अर्थात साहसी खेळांच्या महोत्सवाचं भव्य आयोजन केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या अभूतपूर्व महोत्सवात दापोली तसेच महाराष्ट्र व इतर राज्यातील पर्यटकांनासुद्धा हाॅटएअर बलून,पॅरामोटरिंग असे एकाहून एक सरस व साहसी खेळांचा आनंद घेता येणार आहे.

रविवार दिनांक 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत चालणार्‍या या महोत्सवाची सुरवात दापोलीतील जागतिक स्तरावरच्या सुविधा असणार्‍या राॅयल गोल्डफिल्ड क्लब रिसाॅर्टच्या स्टेडियम वरून होणार असून सहभागींना निवास आणि भोजनासह पॅरामोटरिंग द्वारे समुद्र व किनारपट्टीचे अदभूत हवाई दृश्य पाहात सुट्टीचा निखळ आनंद लूटता येणार आहे .

या महोत्सवातील सर्व साहसी खेळ त्या त्या खेळातील तज्ज्ञ व अनुभवीखेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली खेळवण्यात येणार असल्यामुळे संपूर्णत: सुरक्षीत आहे, दापोलीकरांनी व इतर सर्व पर्यटकप्रेमींनी आपली नावे 8600144496 याभ्रमणध्वनी क्रमांकावर लवकरात लवकर नोंदवावीत असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…