
no images were found
कामगारांना मतदानाची सुट्टी देण्याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक
कोल्हापूर: विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने शासनाने परिपत्रक प्रसारित केले असून त्यानुसार लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ मधील कलम १३५ (ब) तरतुदीच्या आदेशानुसार व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणतीही आस्थापना, कंपन्या, संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगार, कर्मचारी, अधिकऱ्यांना मतदानाच्या दिवशी दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देष आहेत.
तथापि ज्या आस्थापनांना अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, त्या आस्थापनांनी विहीत अर्जासह सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी पत्रकाद्वारे केले आहे.