
no images were found
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत लव आणि कुश यांनी अश्वमेधाचा घोडा अडवला; श्रीराम आणि सीतेच्या वियोगामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न
सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांची कथा सांगितली आहे. अलीकडच्या भागांमध्ये, प्रेक्षकांनी पाहिले की, अश्वमेध यज्ञ बघण्यासाठी आणि श्रीराम या आपल्या आदर्श राजाचे दर्शन घेण्यासाठी लव (शौर्य मंडोरीया) आणि कुश (अथर्व शर्मा) अयोध्येत येतात. परंतु त्यांची निराशा होते आणि त्या दोन दिव्य विभूतींच्या वियोगाचे सत्य समजल्यावर त्यांना धक्का बसतो.
आगामी भागांमध्ये प्रेक्षक बघतील की, अश्वमेध यज्ञाची पूर्णाहुती अगदी जवळ येऊन ठेपलेली असताना शत्रुघ्नला त्या पवित्र अश्वाची जबाबदारी सोपवण्यात येते. दरम्यान, श्रीराम आणि सीता एकमेकांपासून दूर का झाले असतील या प्रश्नाचे उत्तर लव आणि कुश अजूनही शोधत आहेत. त्यांनी खूप प्रयत्न करूनही अजून त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. नियती शत्रुघ्नला त्यांच्या समोर घेऊन येते. जेव्हा लव आणि कुश श्रीरामाला भेटण्याच्या आणि राम-सीतेच्या वियोगाच्या बाबतीतील प्रश्नांचे उत्तर मिळवण्याच्या आशेने अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवतात, तेव्हा नवीनच संकट उभे राहते.
अश्वमेधाचा घोडा अडवल्यामुळे आता काय होईल? आणि शत्रुघ्नला ही दोन दिव्य मुले श्रीरामाचीच असल्याबद्दल समजेल का?
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करत असलेला सुजय रेऊ म्हणतो, “एक राजा म्हणून सत्याचा शोध घेण्याची लव आणि कुशची तळमळ भावुक करणारी आहे. श्रीराम आणि सीता यांच्यातील वियोग समजून घेण्याचे त्यांचे धाडस त्यांच्यातील सशक्त न्याय बुद्धीची प्रचिती देते. त्यांचा दृढनिर्धार आणि त्यांचे सामर्थ्य कौतुकास्पद आहे, आणि या कारणामुळे त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची श्रीरामाच्या मनातील इच्छा प्रबळ झाली.”