
no images were found
मदर्स रेसिपीतर्फे महाराष्ट्र मँगो पिकल लाँच, महाराष्ट्राची अस्सल चव आता थेट तुमच्या घरात
मदर्स रेसिपी हा भारतातील एतद्देशीय अस्सल खाद्यपदार्थांचा ब्रँड आपल्या रूचकर आणि स्वादिष्ट चवींसाठी प्रसिद्ध असून कंपनीने महाराष्ट्र मँगो पिकल हे नवे उत्पादन लाँच केले आहे. हे उत्पादन 200 ग्रॅमच्या पेट जारमध्ये 75 रुपयांना उपलब्ध करण्यात आलं आहे.
प्रादेशिक लोणच्याची चव भागवण्यासाठी खास तयार करण्यात आलेलं हे लोणचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आले असून त्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि इतर महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे. अनोख्या चवीसाठी प्रसिद्ध असलेला आंब्याच्या लोणच्याचा हा प्रकार पारंपरिक महाराष्ट्रीय मसाले आणि स्वादांचा वापर करून बनवण्यात आला आहे. कच्च्या कैरीचा करकरीतपणा आणि त्याला मोहरीचा कडवटपणा, लाल तिखटाचा झणझणीतपणा आणि हळदीची खास चव यांची जोड लाभली आहे. या लोणच्याचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यात हिंग किंचित जास्त प्रमाणात वापरण्यात आले असून त्याचबरोबर काही भाजलेले मसालेही घालण्यात आले आहेत. त्यामुळे लोणच्याची खुमारी आणखी वाढली आहे आणि त्याला महाराष्ट्रीय खवैय्यांची पसंती मिळत आहे. मेथीच्या दाण्यांमुळे वेगळा सुगंध लोणच्याला लाभला असून हे लोणचं रोजच्या जेवणाची रंगत आणखी वाढवणारं असेल.
मदर्स रेसिपीच्या कार्यकारी संचालक सौ. संजना देसाई यांनी अस्सल चव नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे ब्रँडचे प्रयत्न अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, ‘महाराष्ट्र मँगो पिकलमध्ये महाराष्ट्राच्या प्रादेशिक भागातली खास चव अनुभवता येते. त्यात मसाले आणि झणझणीत स्वादांचा वापर करण्यात आला आहे. डाळ-भातासारखं साधं जेवण असो किंवा सणांची मेजवानी या लोणच्याची आंबट, तिखट आणि सुवासिक चव प्रत्येक जेवणाची खुमारी वाढवणारं आहे.’महाराष्ट्र मँगो पिकल आघाडीची सर्व रिटेल दालनं, ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि सुपरमार्केट्समध्ये उपलब्ध करत राज्यातील घराघरात पोहोचेल व जेवणाची रंगत वाढवत राहील याची काळजी घेण्यात आली आहे.