no images were found
डीकेटीईमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव’हा कार्यक्रम उत्साहात संपन्न
इचलकरंजी (प्रतिनिधी): प्रतिवर्षीप्रमाणे या ही वर्षी डीकेटीई च्या राजवाडयामध्ये डीकेटीई, पं. बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ व आपटे वाचन मंदीर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगणीत करणारा ‘स्वरदीपोत्सव’ हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. दिवाळी पाडव्या निमित्त राजवाडयावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने राजवाडा उजाळून निघाला या सर्व अकर्षक रोषणाईने उपस्थितांना डोळयाचे पारणे फीटल्याची अनुभूती मिळाली.
राजवाडयावर लावलेल्या आकर्षक अशा विद्युत रोषणाई, पणत्यांनी व झुंबरांनी मुळातच सुंदर असलेला ऐतिहासिक राजवाडा अधिकच खुलला होता. या दीवाळी पाडव्याचे वैशिष्टये म्हणजे राजवाडयात लावण्यात आलेला आकाशकंदील जो डीकेटीईच्या आयडिया लॅब मध्ये तयार करण्यात आलेला होता. चित्ताकर्षक पार्श्वभूमीवर कार्यक्रम अविस्मरणीय झाला. दुपारी ४.३० ते ८.०० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमांस सुमारे हजाराहून अधिक रसिक श्रोते व नागरिक उपस्थित होते.
नाटय गीतावर आधारीत शास्त्रीय संगीत,भावगिते,भक्तीगीते,सिनेगी
कार्यक्रम संपल्यानंतर राजवाडयावर फटक्यांची आतिषबाजी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली यामुळे राजवाडयाचे सौंदर्य खुलून दिसत होते राजवाडयाचे नयनरम्य असे दृश्य पाहून उपस्थित सर्व श्रोते तसेच नागरिकांचे डोळयांचे पारणे फेडले गेले. कार्यक्रमाच्या आयोजनाबददल संगीत श्रोते व नागरिकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रमास डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, ट्रस्टी डॉ ए.बी.सौंदत्तीकर, संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे, आपटे वाचन मंदीर चे डॉ. कुबेर मगदुम,माया कुलकर्णी, डॉ. सुजित सौंदत्तीकर व पदाधिकारी यांच्यासह पं बाळकृष्णबुवा मंडळाचे पदाधिकारी व कलाकार उपस्थित होते. प्रा. सचिन कानिटकर यांच्या प्रभावी सुत्रसंचालनाने कार्यक्रमाला रंगत आली. ध्वनी व्यवस्था प्रशांत होगाडे यांची होती, विद्युत रोषणाई राजू हावळ यांनी केली.