Home मनोरंजन कलाकार सांगत आहेत त्‍यांच्‍या आवडत्‍या शाकाहारी खाद्यपदार्थांबाबत!

कलाकार सांगत आहेत त्‍यांच्‍या आवडत्‍या शाकाहारी खाद्यपदार्थांबाबत!

2 min read
0
0
24

no images were found

कलाकार सांगत आहेत त्‍यांच्‍या आवडत्‍या शाकाहारी खाद्यपदार्थांबाबत!

जागतिक शाकाहारी दिन शाकाहारी जीवनशैलीचे फायदे दाखवतो आणि व्‍यक्‍तींना आरोग्‍य, पर्यावरण व पशुकल्‍याणावर शाकाहारी खाद्यपदार्थांच्‍या सकारात्‍मक परिणामांचा शोध घेण्‍यास प्रेरित करतो; या दिनाच्‍या साजरीकरणानिमित्त एण्‍ड टीव्‍ही कलाकार जसे स्मिता साबळे (धनिया, ‘भीमा’), नेहा जोशी (कृष्‍णा देवी वाजपेयी, ‘अटल’), सपना सिकरवार (बिमलेश, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’) पहिल्‍यांदाच शाकाहारी खाद्यपदार्थांचे सेवन करण्‍याच्‍या आणि शाकाहारी पाककलांमधील फ्लेवर्स व आनंदाचा शोध घेण्‍याच्‍या उत्‍साहवर्धक गोष्टी सांगत आहेत. सलाड्सपासून स्‍वादिष्‍ट करीपर्यंत त्‍यांच्‍या अनुभवांमधून नवीन खाद्यपदार्थांचे सेवन करण्‍यामधील धमाल दिसून येते, तसेच चाहत्‍यांना शाकाहारी पर्यायांचा शोध घेण्‍यास प्रेरणा मिळते. मालिका ‘अटल’मध्‍ये कृष्‍णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्‍हणाल्‍या, ”मी नेहमी नवीन, आरोग्‍यदायी खाद्यपदार्थांबाबत उत्‍सुक असते, म्‍हणून मी नुकतेच काजू चीज, ताज्‍या भाज्‍या व ग्‍लुटेन-मुक्‍त क्रस्‍टसह वेगन पिझ्झा सेवन केला. हा पिझ्झा फ्रेश, पचनास हलका आणि पौष्टिक होता, ज्‍यामुळे माझ्यामधील शाकाहारी खाद्यपदार्थांबाबत आवड अधिक पक्की झाली. माझे आरोग्‍य व मूल्‍यांच्‍या संदर्भात समाधानकारक अनुभव मिळाला. मला उत्‍साहित वाटले आणि मी विविध शाकाहारी व वेगन आहारांचा आस्‍वाद घेते.” मालिका ‘भीमा’मध्‍ये धनियाची भूमिका साकारणाऱ्या स्मिता साबळे म्‍हणाल्‍या, ”एकदा, मी चुकून टोफू व भाज्‍या असलेली शाकाहारी थाई करी ऑर्डर केली, पण अचंबित बाब म्‍हणजे ती करी खूप स्‍वादिष्‍ट होती. खोबऱ्याचा वापर करून बनवण्‍यात आलेली करी स्‍वादिष्‍ट व पचायला हलकी होती. त्‍या अनुभवाने मला आरोग्‍यदायी फायद्यांसाठी अधिक शाकाहारी खाद्यपदार्थ सेवन करण्‍यास प्रेरित केले. मी आरोग्‍यदायी पर्याय म्‍हणून माझ्या डाएटमध्‍ये शाकाहारी जेवणाचे सेवन करण्‍याचा आनंद घेते.”  

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मध्‍ये बिमलेशची भूमिका साकारणाऱ्या सपना सिकरवार म्‍हणाल्‍या, ”मी आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर प्रवास करते तेव्‍हा अनेकदा शाकाहारी खाद्यपदार्थांचे सेवन करते. यामध्‍ये माझे आवडते होते शाकाहारी बुद्ध बाऊल, ज्‍यामध्‍ये क्विनोआ, भाजलेल्‍या भाज्‍या आणि तहिनी ड्रेसिंग असते. मी घरी क्रीमी कॅश्‍यू सॉस व भाजलेल्‍या भाज्‍यांसह शाकाहारी पास्‍ता बनवण्‍याचा प्रयत्‍न देखील केला. माझ्या मुलीला ते खूप आवडले आणि आता तो आमचा पसंतीचा आरोग्‍यदायी आहार बनला आहे.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्‍हणाल्‍या, ”नुकतेच यूएसएला ट्रिपला गेलेलो असताना माझी मुलगी आणि मी ब्‍लॅक बीन व क्विनोआ वेगन बर्गरचा आस्‍वाद घेतला. या बर्गरवर टॉपिंग म्‍हणून अॅव्‍होकॅडो व कॅश्‍यू-बेस्‍ड सॉस होते. ते अत्‍यंत स्‍वादिष्‍ट होते. या अनुभवामधून मला घरी शाकाहारी पर्यायांना एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याची प्रेरणा मिळाली. शाकाहारी खाद्यपदार्थांच्‍या सेवनाने आपल्‍या आहारामध्‍ये स्‍वाद व टेक्‍स्‍चर्ससह आरोग्‍याची भर होऊ शकते. आरोग्‍यदायी आहार सेवन करा, आरोग्‍यदायी राहा आणि आनंदी राहा!”     

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर   कोल्हाप…