no images were found
माजी सैनिक पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करावेत
कोल्हापूर : माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेंतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्या पाल्यांनी 12 वी परीक्षेत व पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळविले आहेत व त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठीची अधिक माहिती www.ksb.gov.in संकेतस्तळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शासकीय विश्रामगृह जवळ, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र. 0231-2665812 वर संपर्क साधावा.