no images were found
अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांचे नळ कनेक्शन खंडीत
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा व पाणीपट्टी वसुली विभागाच्यावतीने शहर व ग्रामीण भागातील गजानन कॉलनी व मोरया कॉलनीमध्ये संयुक्त नळ कनेक्शन तपासणीची कारवाई करण्यात आली. यावेळी एक अनधिकृत घेतलेले नळ कनेक्शन धारकांचे नळ कनेक्शन जागेवरच खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील वितरण नलीकेस विद्युत मोटर जोडून पाणी उपसा करणाऱ्या कनेक्शनधारकांचेही नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी अनाधिकृत नळ कनेक्शन देण्यास मदत करणाऱ्या संबंधीत कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व नोंदणीकृत प्लंबर यांचा परवाना कायमचा रद्द करण्याचे आदेश त्यांनी जल अभियंत्यांना दिले.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हि कारवाई पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत, शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, मयुरी पटवेगार, मिटर रीडर भास्कर चव्हाण, प्रथमेश माजगांवकर, रमेश देसाई, इंद्रजीत फराकटे, करण खेडकर यांनी केली.
सदरची मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असून शहरातील सर्व नागरिकांनी आपली अनाधिकृत नळ कनेक्शन रितसर अर्ज करुन व योग्य ते शुल्क भरुन नियमित करुन पाणी बिलाची रक्कम वेळेवर भरणा करावी. अशी नळ कनेक्शन कारवाई दरम्यान आढळलेस ती नळ कनेक्शन बंद करणे, संबंधीत मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.