Home शैक्षणिक भारतीय ज्ञान प्रणाली विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे महत्वाचे : प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील

भारतीय ज्ञान प्रणाली विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे महत्वाचे : प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील

16 second read
0
0
25

no images were found

भारतीय ज्ञान प्रणाली विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे महत्वाचे : प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील

 

कोल्हापूर( प्रतिनिधी): राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश केला असल्याने ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील यांनी केले.
            शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील कला, वाणिज्य व शास्त्र विद्याशाखांसाठी भारतीय ज्ञान प्रणाली याबाबत राजर्षी शाहू सिनेट सभागृह येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता प्रा.डॉ.एम.एस.देशमुख,विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता प्रा.डॉ.श्रीमती एस.एच ठकार, दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. के. बी.पाटील, उपकुलसचिव श्री.व्ही.बी.शिंदे, सहा.प्राध्यापक, समन्वयक तसेच विविध महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.
           प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पाटील म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 हे देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात बहुआयामी बदल घडवून आणणारे आहे. त्यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण देवून भारतीय ज्ञान प्रणाली या अभ्यासक्रमात शिक्षक तज्ञ बनविणे गरजेचे आहे.शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 चा अंगीकार करून विद्यार्थी,समाज व देशाला दिशा देण्याचे कार्य केले पाहिजे. भारतीय ज्ञान प्रणाली या अभ्यासक्रमाची पद्धत शिक्षकांनी समजून घेतली पाहिजे.विद्यार्थ्याच्या ज्ञानाच्या क्षमता वाढविण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली त्यांच्या पर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.भारतीय तत्वज्ञान व संस्कृती याचा याचा अभ्यास भारतीय विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.तसेच भारतीय सण यामध्ये सांस्कृतिकता आहे.त्या पाठीमागील तत्वज्ञान व विज्ञान माहित करून घेतले पाहिजे. असे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पाटील यांनी सांगितले.
यावेळी संचालक डॉ.के.बी.पाटील यांनी ‘भारतीय ज्ञान प्रणाली’,फलटण येथील मुधोजी कॉलेज मधील तत्त्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.एन.के.रासकर यांनी कला व भारतीय ज्ञान प्रणाली’ याविषयावर तसेच पलूस येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.साळुंखे यांनी ‘वाणिज्य व भारतीय ज्ञान प्रणाली’ तर स्कुल ऑफ नानो सायन्स आणि टेक्नोलॉजी येथील सहा.प्राध्यापक डॉ.पी.जे.पाटील यांनी ‘विज्ञान व भारतीय ज्ञान प्रणाली’ याविषयावर मनोगते व्यक्त केली.
           यावेळी पाचगणी येथील बहाई अकादमीचे संचालक डॉ.एल.आझादी यांनी मुल्याधिष्टीत शैक्षणिक अभ्यासक्रमावर ऑनलाइन सादरीकरण करून माहिती दिली.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक अधिष्ठाता प्रा.डॉ.एम.एस.देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन सहा.प्राध्यापक डॉ.नितीन रणदिवे यांनी केले.तर डॉ.सचिन भोसले यांनी आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…