no images were found
शिवाजी विद्यापीठात आज भारतीय ज्ञान प्रणालीवर कार्यशाळा
कोल्हापूर(प्रतिनिधी) : ऑक्टोबर, शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील कला,वाणिज्य व शास्त्र विद्याशाखांसाठी भारतीय ज्ञान प्रणाली याबाबत गुरुवार दि. २४ऑक्टोबर २०२४ रोजी शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सिनेट सभागृह येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक डॉ. के. बी.पाटील यांनी दिली. देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात बहुआयामी बदल घडवून आणणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 हे विद्यार्थी केंद्रित आहे.त्या अनुषंगाने शिक्षकांचे,विद्यार्थ्यांचे आणि एकूण समाजाचे उद्बोधन आणि प्रशिक्षण या धोरणाच्या यशस्वीते करता आवश्यक आहे. हे धोरण विद्यार्थ्यांना अध्ययनात पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लवचिक आणि उदारमतवादी आहे. याच्या प्रभावी अंमलबजावणी करता शिक्षण संस्था, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि विद्यापीठे या सर्व घटकांना आपला शिक्षणाप्रती असलेला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षात ठोस पावले उचलली आहेत. या धोरणाबद्दल शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता विविध चर्चासत्रे ,परिसंवाद व कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात येत आहे.. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील कला,वाणिज्य व शास्त्र विद्याशाखांसाठी भारतीय ज्ञान परंपरा याबाबत गुरुवार दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्ह्याकरिता शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सिनेट सभागृह येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी आपल्या महाविद्यालयातील विद्याशाखानिहाय एक शिक्षक पाठवून सहकार्य करावे. असे आवाहन अधिष्ठाता प्रा.डॉ.एम.एस.देशमुख यांनी केले आहे.