no images were found
कोल्हापूरमध्ये काँग्रेस व शिवसेना एकत्र येण्याची शक्यता !
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आज जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये तिकीट मागण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती. आज सकाळ पासुन मुलाखतीतस प्रारंभ झाला आहे.
याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालीकेमध्ये जर शिवसेना शिंदे गट एकत्र आला तर आम्ही जरूर विचार करू असं वक्तव्य केल्याने कोल्हापूरमध्ये खळबळ माजली आहे. तसेच हिम्मत असेल तर महापौर पद हे अडीच वर्षे एकाच व्यक्तीला देण्यात यावे,कारण एक वर्षाचा महापौर केल्यावर दोन महिने सत्कारामध्ये आणि दोन महिने राजीनामा मागण्यात जातो उर्वरित आठ महिने सुट्या धरल्या तर कमी कालावधी मिळतो. जर कोल्हापूर मध्ये शिंदे शिवसेना व कॉंग्रेस बरोबर येणार असेल तर जरूर विचार करू असे बोलण्यामुळे महानगरपालिका मध्ये एक वेगळेच ट्विस्ट आल्याने खळबळ माजली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या या निवडणुकीत जे मित्र पक्ष सोबत येतील त्या सर्वांना बरोबर घेऊन शक्यतिथे युती करु त्याच प्रमाणे राजु शेट्टी, गणपतराव पाटील व वंचित आघाडीला सोबत घेवुन जिल्हा परिषद वर झेंडा फडकू असेही ते बोलतांना म्हणाले.
या वेळी त्यांच्या सोबत आमदार जयंत आसगावकर, उदयांनीदेवी साळुंखे, गोकुळचे संचालक चौगुले, युथ बॅंकेचे चेतन नरके, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक राजेश लाटकर व असंख्य तिकीट मागणारे उमेदवार व त्यांचे पाठीराखे या मुळे कॉंग्रेस कमिटीत गर्दीच गर्दी होती.