
no images were found
विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील दहा मतदासंघासाठी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.